Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात

नाच्या पडद्याला इजा होऊ शकते. तसेच वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, हृदय जोरजोरात धडधडणे
Published on

वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ध्वनी प्रदूषण हे मानवी जीवनासाठी घातक असून त्याचा मानवी जीवनावर नकारात्मक दीर्घकालीन प्रभाव पडत आहे. त्यामुळे यावर वेळीच उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.


अपेक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे कान-नाक-घसा आणि व्हॉईस सर्जन डॉ. बिन्ही देसाई यांनी सांगितले की, ध्वनी प्रदूषण हा एक सायलेंट किलर आहे. याचा प्रौढ आणि मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात
Mumbai Pollution: पुन्हा उंचावली मुंबईच्या प्रदूषणाची पातळी; भायखळा रेड झोनमध्ये

श्रवण प्रणाली, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली, श्वसन प्रणाली, न्यूरोलॉजिकल आणि मानसशास्त्रीय प्रणालीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तात्पुरते किंवा कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होणे, टिनिटस, कान दुखणे, कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. तसेच वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे उच्च रक्तदाब, हृदय जोरजोरात धडधडणे, असे आजार होऊ शकतात. श्वसनसंस्थेवर परिणाम होऊन श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

मज्जासंस्थेवर परिणाम होऊन डोकेदुखी, तणाव पातळीत वाढ, मायग्रेन, निद्रानाश, एकाग्रता कमी होणे, दृष्टिदोष संज्ञानात्मक कार्यक्षमता आणि स्मरणशक्ती समस्या उद्‌भवू शकतात. ध्वनी प्रदूषणामुळे मुलाच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होतो आणि मुलाच्या वागण्यात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

यामुळे वाढतेय आवाजाची पातळी


जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, ६५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा प्रदूषण म्हणून वर्गीकरण करण्यात येतो. रस्त्यावरील रहदारीचा आवाज सर्वाधिक प्रदूषित करतो. कारचे हॉर्न ९० डेसिबल आहेत आणि बस व रेल्वेचे हॉर्न १०० डेसिबलपेक्षा जास्त आहेत. ड्रिलिंगसारख्या बांधकाम साईटवर ११० डेसिबल उत्सर्जित करतात.

Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात
Navi Mumbai Pollution: वायू प्रदूषणामुळे खारघरवासीयांची झोपमोड; होत आहे डोकेदुखी आणि इतर त्रास

मुंबईत दरवर्षी आवाजाची पातळी एक डेसिबलने (डीबी) वाढते. प्राथमिक अभ्यासानुसार, शहर अधिकाधिक गोंगाटमय होत आहे आणि यावर्षी सरासरी आवाजाची पातळी ७८ डेसिबलवर पोहोचली आहे, तर निवासी क्षेत्रांसाठी शिफारस केलेले आवाजाचे प्रमाण ५५ डेसिबल आहे. त्यामुळे, आवाजाचे प्रदूषण हे मुंबईच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.

अचानक खूप कर्कश मोठा आवाज कानावर पडला की, फक्त कानावरच नाही तर हृदयावरही परिणाम होतो. आपल्याकडे नियमांचे पालन होत नाही, प्रत्येक सण मोठ्या आवाजातील ढोल-ताशे, स्पिकर्स लावून साजरे केले जातात. यातून अचानक काहींना कमी ऐकू येण्याची स्थिती निर्माण होते. तसेच डोकेदुखी, रक्तदाब वाढतो.


- डॉ. विनोद गिते, कान-नाक-घसा विभाग, कूपर रुग्णालय

Mumbai Pollution: वाढत्या ध्वनी प्रदूषणामुळे मुंबईकरांचे आरोग्य धोक्यात
Mumbai Pollution: मुंबईच्या हवेची गुणवत्ता लवकरच सुधारणार; हे आहे महत्वाचे कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.