vashi market mumbai
vashi market mumbai sakal

Navi Mumbai : ग्राहकांना दिलासा, गृहिणींसाठी आनंदवार्ता, भाज्‍यांच्या दरात मोठी घसरण

स्वस्त आणि ताज्‍या भाज्या उपलब्ध होत असल्‍याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे | The availability of cheap and fresh vegetables has given relief to housewives
Published on

Navi Mumbai News: राज्यात गारवा वाढल्‍याने भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्‍यांतून घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे.

घाऊक दरात भाज्‍यांच्या दरात मोठी घसरण झाल्‍याने किरकोळ बाजारातही भाज्‍या सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात आल्‍या आहेत. स्वस्त आणि ताज्‍या भाज्या उपलब्ध होत असल्‍याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. (Big fall in vegetable prices)

vashi market mumbai
Navi Mumbai News: 'एनएमएमटी'ची उरण बस सेवा बंद; हजारो प्रवाशांना फटका

सध्या बाजारात भाज्यांच्या दररोज सरासरी ६५० गाड्या येत आहेत. घाऊक बाजारात भाज्यांचे दर अवघे ३० ते ४० रुपये प्रतिकिलो आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ४० ते ५० रुपये किलोने मिळू लागल्‍या आहेत. केवळ शेवग्‍याचे दर अद्याप चढे असून घाऊक बाजारात ४५ ते ५० रुपये प्रतिकिलो तर किरकोळ बाजारात ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असे आहेत. टोमॅटोचे दर पुन्हा २० रुपये किलोवर आले आहेत. पुढील महिनाभर भाज्‍यांची मोठ्या प्रमाणात आवक होणार असल्‍याने दर स्‍थिर राहण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. सध्या गुजरात, कर्नाटक, राजस्थानमधूनही भाज्यांची आवक वाढली आहे. (An average of 650 carts of vegetables are coming every day)

vashi market mumbai
Navi Mumbai: आता वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार; मनपाने घेतला पाच उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय

भाज्‍यांचे दर प्रतिकिलो रुपयांत

भेंडी-१८ - ४०

कोबी-१० - ४०

वांगी-१६ - ४०

हिरवा वाटाणा-३० - ५०

फ्लॉवर -१०-६०

फरसबी-२३ -६०

भोपळा -१२- ४५

मिरची-३० -७०

शिराळी-३०-५०

घेवडा-३०-६०

टोमॅटो-२० - ५०

vashi market mumbai
Navi Mumbai Crime: अमली पदार्थासह नायजेरियनला अटक!

लसूनही स्‍वस्‍त


मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाली आहे. त्यामुळे आठवडाभरापूर्वी ३५० ते ४०० रुपयांवर गेलेले दर आता २०० ते २५० रुपये किलोवर आला आहे.(Bombay Agricultural Produce Market Committee)

घाऊक बाजारात लसणाच्या घसरण होण्यास सुरुवात झाल्यामुळे किरकोळ बाजारात ५०० रुपये किलोपर्यंत गेलेला दर ४०० रुपयांवर आला आहे. एपीएमसी बाजारात लसणाच्या चार ते पाच गाड्यांची दैनंदिन आवक होत आहे.(vashi market)

vashi market mumbai
Navi Mumbai Crime: अल्पवयीन मुलीकडून वेश्याव्यवसाय करुन घेणारे त्रिकुट जेरबंद

गुजरात व मध्यप्रदेशातून आवक सुरू झाली आहे. त्‍यामुळे पुढील महिनाभरात लसणाचे दर आणखी घसरतील, असा अंदाज विक्रेते अशोक वांळुज यांनी वर्तवला आहे. १२० ते २०० रुपये किलो असणारा लसूण दोन महिनांपूर्वी घाऊक बाजारात चक्‍क ३५० ते ४०० रुपये किलोपर्यंत गेला होतो.(Inflow has started from Gujarat and Madhya Pradesh)

त्यामुळे सर्वसामान्यांना लसूण खरेदी करणे कठीण झाले होते. आता नवीन लसणाची आवक सुरू झाल्यामुळे दर कमी झाले आहेत. आठवडाभरापूर्वी एपीएमसीत दोन ते तीन गाड्यांची आवक होत होती, आता चार ते पाच गाड्या रोज येत असल्याचे व्यापारी वाळुंज यांनी सांगितले.

vashi market mumbai
Navi Mumbai Crime: अब पत्ताभी नही हिलेगा; गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.