Iqbal Singh Chahal
Iqbal Singh Chahal sakal

Mumbai Breaking: लोकसभा निवडणुकीपूर्वी पालिका आयुक्त चहल यांची होणार बदली!

राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्राद्वारे निर्देश दिले असल्याचे समजते.
Published on

Iqbal Chehal: लोकसभा निवडणुकीपूर्वी आयुक्त इक्बाल सिंग चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू आणि अश्विनी भिडे यांची बदली होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्राद्वारे निर्देश दिले असल्याचे समजते.

Iqbal Singh Chahal
Mumbai News: विमानात झाला बिघाड प्रवाशांना; पाच तास बसावे लागले आतमध्येच

महापालिका आयुक्त चहल आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त यांनी तीन वर्षांची सेवा पूर्ण केली आहे. त्यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी बदली झाली पाहिजे, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना पत्राद्वारे निर्देश दिले आहेत. चहल यांची ८ मे २०२० रोजी कोरोना महामारीच्या काळात पालिका आयुक्त म्हणून प्रवीण परदेशी यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली होती.

Iqbal Singh Chahal
Mumbai News : दीड तासाचा विरार ते पालघर प्रवास आता अवघ्या पंधरा मिनिटावर

तर भिडे यांची मे २०२० मध्ये अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती; परंतु त्यानंतर २०२२ मध्ये त्यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली करण्यात आली. पालिका अतिरिक्त आयुक्त वेलरासू हे प्रकल्पांचे अतिरिक्त महापालिका प्रभारी होते.

आयुक्त चहल यांच्या कोरोनाच्या काळातील मुंबई महापालिकेच्या कारभारावर चौकशी यंत्रणांनी ठपका ठेवण्यात आला आहे. कोरोना काळात औषध खरेदी आणि वैद्यकीय साधनांची कोट्यवधी रुपयांची खरेदी झाल्याचे आरोप भाजपने केला आहे. दुसरीकडे चहल यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीत केलेल्या कामाची दखल केंद्रीयस्तरावर घेण्यात आली.

Iqbal Singh Chahal
Mumbai News: मुंबईहून मॉरेशियसकडे निघालेल्या विमानातील AC बंद, पाच तास बसवून ठेवल्याने प्रवाशांची तब्येत बिघडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.