Railway News navli fatak
Railway News navli fatak sakal

Railway News: नवली रेल्वे फाटक खुला करण्याचे आदेश

Published on

Railway News: पश्चिम रेल्वेच्या नवली रेल्वे फाटकाजवळ उड्डाणपुलाचे काम चालू आहे. या ठिकाणचे रेल्वे फाटक बंद केल्याने पालघरच्या पूर्व भागातील नवली व परिसरातील अन्य गावांतील लोकांना पश्चिमेकडे जाण्यासाठी पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते.

नागरिकांनी व नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करत फाटक खुला करून द्यावा, अशी विनंती केली होती. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची अडचण लक्षात घेऊन रेल्वे फाटक खुला करण्याचा आदेश रेल्वे अधिकाऱ्यांना दिला आहे. त्यानुसार फाटक खुला झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.(navli fatak news)

Railway News navli fatak
Wardha Yavatmal Railway: वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज रेल्वेचे काम पूर्ण, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन

पालघर स्थानकाच्या जवळ नवली रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी रेल्वे उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यामध्ये येत असताना रेल्वे अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हे फाटक बंद करण्यासाठी मागणी केली होती.

त्यानुसार १२ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ पर्यंत फाटक बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढला होता, मात्र या काळात रेल्वेने युद्धपातळीवर काम केले नाही. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांनी पुन्हा रेल्वे फाटक बंद करण्याची मुदत मागितली होती. (palghar news)

Railway News navli fatak
Karad Railway Station : कऱ्हाड रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

त्याप्रमाणे १२ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२४ पर्यंत फाटक बंदची मुदतवाढ देण्यात आली, मात्र फाटक बंद झाल्याने लोकांची गैरसोय होत होती.

नगरसेविका हिंदवी पाटील व नवली रेल्वे फाटक उड्डाणपूल समन्वय समितीने जिल्हाधिकारी यांची १६ फेब्रुवारीला भेट घेत उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय, दवाखाना, बाजारपेठ याकरिता पर्यायी रस्त्याने पाच किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते.(latest palghar news marathi)

Railway News navli fatak
Railway News: उच्च पदस्थ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना सीबीआयकडून अटक!

दहावी व बारावीच्या परीक्षा चालू असल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने हा रस्ता तात्काळ खुला करण्याची विनंती केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला नवली फाटकाला प्रत्यक्ष भेट देऊन उड्डाणपुलाच्या बांधकामाची पाहणी केली.

संबंधित कंत्राटदाराने काम अतिशय संथ गतीने चालू ठेवल्याने फाटक खुला करण्याचा आदेश त्यांनी रेल्वे प्रशासनाला दिले.

Railway News navli fatak
Pune Division Railway : पुणे विभागात आणखी २४ रेल्वे स्थानके ; दौंड-अंकाईपर्यंतचा मार्ग पुणे विभागात समाविष्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.