Mumbai Local News: मुंबईतील २० लोकल रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट
Mumbai News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेंतर्गत देशभरातील ५५४ रेल्वे स्थानकांचा कायापालट आणि १५०० रोड ओव्हर-अंडर पुलांच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी (ता. २६ ) दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महामुंबईतील २० उपनगरीय रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
विमानतळाच्या धर्तीवर रेल्वे स्थानकात सुविधा पुरविण्यासाठी भारतीय रेल्वेने अमृत भारत योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील एकूण १ हजार ३०९ स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे.
सोमवारी २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता देशभरातील ५५४ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास कामांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, एकूण १ हजार ३०९ रेल्वे स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील ५६ स्थानकांचा अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत विकास करण्यात येणार आहे. या ५६ रेल्वे स्थानकांपैकी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील १२ स्थानकांचा समावेश आहे.(Marine Lines, Charni Road, Grant Road, Lower Parel, Prabhadevi, Jogeshwari, Malad and Palghar)
यात भायखळा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, वडाळा रोड, माटुंगा, कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा आणि इगतपुरी यांचा समावेश आहे; तर पश्चिम रेल्वेवरील मरिन लाइन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परेल, प्रभादेवी, जोगेश्वरी, मालाड आणि पालघर स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.(Byculla, Sandhurst Road, Chinchpokli, Wadala Road, Matunga, Kurla, Vidyavihar, Mumbra, Diva, Shahad, Titwala and Igatpuri)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.