Crime ltest News
Crime ltest Newssakal

Crime News: दागिन्यांवर डल्‍ला मारणाऱ्या 'त्या' महिलेला पोलिसांनी केली अटक

Crime News: ब्युटीशियनच्या घरात दागिन्यांवर डल्‍ला मारणारी गजाआड
Published on

Panvel News: ब्युटी पार्लर चालविणाऱ्या महिलेच्या घरामधून ग्राहक म्हणून गेलेल्या महिलेने ११ लाख १५ हजार रुपये किमतीच्या दागिन्यांची चोरी केल्‍याची घटना समोर आली होती.

याप्रकरणी महिलेला खांदेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिमरन कौर असे या महिलेचे नाव असून खांदेश्वर पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने हस्तगत केले आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार विवाहिता विपुला भालेकर (वय २५) ही पनवेलमधील वाजे येथे कुटुंबासह राहण्यास असून तिचे त्याच ठिकाणी ब्युटी पार्लर आहे

Crime ltest News
Crime News : सासवडजवळ अफूची शेती! पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई, दोघांना अटक

सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती मिळाल्याने काही दिवसांपूर्वी सिमरन कौर हिने वुपालाला ब्युटी पार्लरच्‍या व सर्व्हीससाठी संपर्क साधला होता. त्यावेळी विपुलाने सिमरन कौर हिला आसूडगाव येथील घरी नेऊन तिला ब्युटी पार्लरची सर्व्हीस दिली होती.

त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी पुन्हा सिमरन कौर ही ब्युटी पार्लरची सर्व्हीस घेण्यासाठी दुपारी १२ वाजता आसुडगाव येथे गेली. यावेळी मात्र तिने विपुलाची नजर चुकवून कपाटातील लाखो रुपयांचे दागिने लंपास केले. त्‍यानंतर काही तासाने विपुलाला कपाटातील दागिने चोरी झाल्‍याचे निदर्शनास आले.

Crime ltest News
Pune Crime News : चाकणमध्ये वाढतोय अल्पवयीन गुन्हेगारीचा ट्रेंड ? ; महाळुंगे परिसरात पोलिसांची भीती कमी होतेय का

त्यामुळे विपुलाने तत्काळ सिमरनला फोन करून आपल्या घरी बोलावून घेतले. सिमरन आसुडगाव येथे गेल्यानंतर विपुलाने तिच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी करून दागिने परत देण्यास सांगितले. मात्र, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली.

यामुळे विपुला व तिच्या कुटुंबीयांनी खांदेश्वर पोलिस ठाणे गाठून सिमरन कौर हिच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सिमरन कौर हिला ताब्यात घेऊन तिच्याकडे दागिन्यांबाबत चौकशी केल्यानंतर सिमरनने विपुलाच्या घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली.

Crime ltest News
Pune Crime News : धक्कादायक! आधी पत्नीच्या डोक्यात घातला दगड अन्.... नंतर स्वत: उचललं टोकाचं पाऊल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.