Mumbai: महाराष्ट्रात सुरू होणार Defense Startup, संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करणार, फडणविसांची घोषणा
Thane News: महाराष्ट्रात संरक्षण उद्योगाला चालना देण्यासाठी नवे धोरण तयार करण्यात येईल, तसेच या क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी एरोस्पेस ॲण्ड डिफेन्स मॅन्युफॅक्चरींग धोरण नव्याने अद्ययावत केले जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
तर वितरण साखळीवर भर देऊन नागपूर, शिर्डी, पुणे व रत्नागिरी या चार ठिकाणी डिफेन्स क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीला आर्थिक बळकटी देण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागामार्फत संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी मोशी येथील इंटरनॅशनल एक्झीबिशन ॲण्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे ‘महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्सपो २०२४’ प्रदर्शन भरविले होते. याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले, त्याप्रसंगी ते बोलत होते.
डिफेन्स एक्सपोमध्ये डिफेन्स स्टार्टअप, उद्योजकांसाठी संरक्षण क्षेत्रातील संधी, संरक्षण क्षेत्राशी निगडित धोरणे इ. विषयावर शनिवारी (ता. २४) चर्चासत्र, मार्गदर्शन केले होते. तसेच महाराष्ट्रातील संरक्षण क्षेत्राशी निगडित प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे उत्पादन घेणाऱ्या उद्योजकांचे विविध दालनांत प्रदर्शन केले. या डिफेन्स एक्पोत कोकण विभागातील २४ उद्योग घटकांनी आपला सहभाग नोंदविला.
प्रदर्शनात ठाणे जिल्ह्यातील प्रिसीहोल आर्म्स प्रा. लि., डबीर इंडस्ट्रीज, मॅग-५ इनोवेशन्स प्रा. लि., मे. आयडिया फोर्ज टेक्नॉलॉजी लिमिटेड, क्रुगर व्हेंटिलेशन इंडस्ट्रीज इंडिया प्रा. लि., फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडिया, एस.एस. नातू इंजिनीअरींग प्रा. लिमिटेड, एच.डी.
फायर प्रोटेक्ट प्रा. लिमिटेड, एल फॉण्ड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्कर इक्विपमेंट्स प्रा. लि., स्टॅम्प आयटी सोल्युशन्स प्रा. लि., मेयर इंडस्ट्रीज प्रा. लि., स्टीम एरिट्रिक कंट्रोल इ. तेरा घटकांनी सहभाग घेतला. तसेच पालघर जिल्ह्यातील सनराईज इंडस्ट्रीज, ओरिगा मार्केट, पद्मा इंडस्ट्रीज, महालक्ष्मी इंजिनीअरींग वर्कस्, साई ल्युमिनस आणि कास्टिंग इ. याशिवाय रायगडमधील आहिल प्रॉडक्ट्स कंपनी लि., मे. ॲम्प्ट्रॉनिक्स टेक्नो प्रा. लि., एस.एच.एम. शिप केयर प्रा. लि., सुनील फोर्जिंग आणि स्टील इंडस्ट्रीज, जयश्री गल्वा प्रा. लि., टाटा स्टील लिमिटेड अशाप्रकारे कोकण विभागातून २४ उद्योग घटकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
एक हजार एकर जागा देणार - सामंत
प्रदर्शनातील विविध दालनांना नामांकित उद्योजक, शासकीय अधिकारी, इंजिनीअरींग/बी-टेक महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. संरक्षण क्षेत्रीतील उद्योगांच्या मागणीप्रमाणे एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्याची उदय सामंत यांनी ग्वाही दिली. एमएसमईसाठी अधिक सुविधा आणि सवलती देण्याचे धोरण स्वीकारण्यात येत असल्याने उद्योगांचे विस्तारीकरण व विकास होण्यास मदत होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.