Mumbai Crime
Mumbai CrimeSakal

Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; एक कोटी ८३ लाखांचा चरस जप्त

चरस तस्करीच्या जाळ्यावर प्रहार: ठाणे पोलिसांची तब्बल १.८३ कोटींची ड्रग्ज जप्ती
Published on

Thane Crime: हॅश ऑईलच्या (चरस) मोठ्या साठ्यासह या अमली पदार्थ विक्रीप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने एकूण पाच आरोपींना अटक केली आहे.

गुन्हे शाखा युनिट- पाचच्या पथकाने अमली पदार्थविरोधी कारवाईत आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आणि किमती दुर्मीळ अमली पदार्थ (चरस) हॅश ऑइल हस्तगत केल्याची कारवाई केली.

हस्तगत केलेल्या हॅश ऑईलची बाजारात एक कोटी ८३ लाख ३४ हजार ९८० रुपये असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली.

Mumbai Crime
Navi Mumbai Crime: तुर्भे परिसरातून तीन बांगलादेशी महिलांना अटक

अमली पदार्थाच्या तस्करांवर कडक कारवाईच्या आयुक्तांच्या निर्देशांची अंमलबजावणी करीत गुन्हे शाखा युनिट- पाचच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे वागळे इस्टेट इंदिरानगर परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपी ऋषभ भालेराव (वय २८) याला अटक केली.

यामध्ये आरोपीने विक्रीसाठी आणलेला ६० किलो ५०० ग्रॅम वजनाचा ३१ लाख दोन हजार २०० किमतीचा गांजा, २९० ग्रॅम चरस, १९ छोट्या चरस (हॅश ऑइल) असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणात हॅश ऑईलची विक्री ही इन्स्टाग्राम या समाजमाध्यातून होत असल्याचे समोर आले होते. आरोपी भालेराव याने चौकशीत दिलेल्या माहितीचा धागादोरा घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने अभिजित अविनाश भोईर (वय २९), पराग नारायण रेवंडकर (वय ३१) यांना मंगळवारी (ता. २०) अटक केली.

Mumbai Crime
Nagpur Crime: 'तू तिला किती वेळा भेटलास?' असं म्हणत कॅफे मालकाला जबर मारहाण, आठ जणांकडून चाकूचा धाक दाखवत अपहरण

हे दोघे ऋषभ संजय भालेराव याला अमली पदार्थ पुरवत होते. तर या आरोपींच्या माहितीवरून पोलिसांनी आरोपी मामा ऊर्फ सुरेंद्र बाबूराव अहिरे (वय ५४) आणि राजू हरिभाऊ जाधव (वय ४०) यांना नाशिक येथून शुक्रवारी (ता. २३) अटक केली.

यामध्ये आरोपी मामा ऊर्फ सुरेंद्र यांच्याकडून १२ लाख ७० हजार ७०० रुपयांच्या किमतीचे १२७ ग्रॅम हॅश ऑइल तर राजू जाधव यांच्याकडून एक कोटी ३८ लाख रुपये किमतीचे एक किलो ३८० ग्रॅम हॅश ऑइल हस्तगत करण्यात आले. या संपूर्ण अटक प्रकरणातील चार आरोपींकडून एक किलो ५०७ ग्रॅम हॅस ऑइल हस्तगत करण्यात पोलिस पथकाला यश आले.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून विक्री


हॅश ऑईलची विक्री आरोपी हे ग्राहकांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क करून करत होते. या आरोपींच्या इन्स्टाग्रामवर तब्बल ३,७०० फॉलोवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापूर्वी अटक केलेल्या संजय भालेराव, अभिजित भोईर, पराग रेवंडकर यांना हॅश ऑईलचा पुरवठा हे आरोपी मामा ऊर्फ सुरेंद्र आणि राजू जाधव हे करीत होते. गुन्हे शाखा युनिट- पाचच्या पथकाने त्रिकूट तस्करासह पुरवठादारालाही अटक करून अमली पदार्थ तस्करांचे कंबरडे मोडले आहे.

Mumbai Crime
Jodhpur Crime News: एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू! पत्नी-मुलांचे कालव्यात तर पतीचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.