Jailed
Jailedesakal

Mumbai Crime: दुकानासमोर कचरा टाकण्यास मनाई केली म्हणून केली मारहाण; सहा जणांना सात वर्षे सश्रम कारावास!

एका महिलेला मनाई केली असता त्या महिलेच्या मुलांनी तेली यांना मारहाण केली होती | When a woman was forbidden, the woman's children beat up Teli
Published on

Thane News: दुकानासमोर कचरा टाकण्यास मनाई केली, म्हणून दुकानदाराला बेदम मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे.

न्यायालयाने आरोपींना सात वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींमध्ये एका माजी नगरसेविकेच्या पतीचाही समावेश आहे. ११ वर्षांपूर्वी हा गुन्हा घडला होता.

Jailed
Mumbai News: सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेट; पोलिसांकडून कारवाई

मुंब्रा येथील श्रीलंका विभागात राहणारे जलाल तेली यांचे चिकन शॉप आहे. तेली यांच्या दुकानासमोर कचरा टाकण्यास एका महिलेला मनाई केली असता त्या महिलेच्या मुलांनी तेली यांना मारहाण केली होती.

या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाही आरोपींनी दाद दिली नव्हती. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता पोलिसांनी सलीम शेख, रईस इद्रिस अन्सारी, राजू इद्रिस अन्सारी, सरफराज अद्री संसारी, रमिज इद्रिस संसारी आणि मुस्ताक शेख या आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.

Jailed
Mumbai Mega Block: रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; प्रवास करण्याआधी वाचा संपूर्ण माहिती

हे प्रकरण गुरुवारी (ता. २९) ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रेमल विठ्ठलानी यांच्यासमोर अंतिम सुनावणी आले असता सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी न्यायालयासमोर सादर केलेले साक्षी पुरावे आणि केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपींना दोषी ठरविण्यात आले.

सर्व आरोपींना सात वर्षांची सक्त मजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला. दंडापैकी ५० हजार रुपये जखमी झालेल्या तेली यांना भरपाई म्हणून द्यावेत, असे आदेशही न्यायाधीशांनी दिले. दरम्यान, शिक्षा झालेल्यांमध्ये सरफराज अन्सारी हे एका माजी नगरसेविकेचे पती आहेत.

Jailed
Mumbai Metro: वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावरील सात स्थानकांचा होणार कायापालट!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.