Thane  namo park
Thane namo park sakal

Thane News: नमो सेंट्रल पार्क परिसरात मोठे वाहतूक बदल

दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून सरळ जाऊन गेट के तीनमार्गे सेंट्रल पार्क येथे जातील | Dosti will go straight through the West Country entrance to Central Park via Gate K
Published on

Thane News: नमो द सेंट्रल पार्क पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी ठाणेकरांची झुंबड उडत आहे. त्यातच येथील रस्त्यावर मलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी खोदकाम करण्यात येत आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ब्रोडवे ऑटोमोबाइल्स पेट्रोल पंप ते विहंग इन हॉटेल या सेवा रस्त्यावरून पार्ककडे जाणाऱ्या मार्गात बदल केल्याची माहिती वाहतूक उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

Thane  namo park
Thane News : ठाण्यात धडकणार 'भारत जोडो न्याय यात्रा'; राहुल गांधीच्या आगमनाने कॉंग्रेसला येणार सुगीचे दिवस

नमो द सेंट्रल पार्क पाहण्यासाठी येणाऱ्या ठाणेकर आणि वाहने ही रस्त्यावर पार्किंग करण्यात येत आहेत. सुट्टीच्या काळात या वाहनांची संख्या ही दोन हजार ते अडीच हजार एवढी जाते. त्यामुळे नंदीबाबा मंदिर चौक, बोकाळी नाका, पार्कसिटी, लोढा आमाय व कोलशेत गाव या मार्गावर वाहतूक कोंडी होत आहे.

यामध्ये कापुरबावडी सर्कल येथून येणारी वाहने माजिवडा प्रभाग समिती सिग्नल बाळकुम नाका सिग्नल-दादलानी पार्ककडे जाणारा चौकातून ठाणेहून भिवंडीकडे जाणारे वाहिनीवर पुढे सरळ जाऊन डावे बाजूला वळण घेऊन, दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेशद्वारातून सरळ जाऊन गेट के तीनमार्गे सेंट्रल पार्क येथे जातील.

Thane  namo park
Thane Lok Sabha Candidate: ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार ठरला? राजन विचारेंना मिळणार आव्हान

दुसरा पर्यायी मार्ग कळव्याहून येणारी वाहने बाळकूम नाका सिग्नलवरून उजव्या बाजूस वळण घेत दोस्ती वेस्ट कॉन्ट्री प्रवेश द्वारातून सेंट्रल पार्क येथे जातील. सदर अधिसूचना प्रसिद्ध झाल्या तारखेपासून ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्यात येत आहे.

काही हरकत अगर सूचना असल्यास त्या लेखी स्वरूपात पोलिस उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा कार्यालय, तीन हात नाका येथे नोंदवाव्या, असे आवाहन वाहतूक शाखेद्वारे करण्यात आले आहे.

Thane  namo park
Thane-Mulund New Station: ‘श्रीस्थानक’ ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या रेल्वेस्थानकाला हे नाव देण्याची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.