Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: असा असणार मुंबईचा वांद्रे-वर्सोवा सी लिंक; मुंबईकरांना मिळणार फायदा

Mumbai News: १८ हजार कोटी रुपये खर्चून भर समुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जाणार आहे
Published on

Mumbai News: मुंबईच्या पश्‍चिम उपनगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुमारे १८ हजार कोटी रुपये खर्चून भर समुद्रातून १७ किलोमीटरचा सागरी सेतू उभारला जाणार आहे.

त्यासाठी जगातील सर्वात उंच लोखंडी टॉवर अशी ओळख असलेल्या फ्रान्समधील आयफेल टॉवरच्या तुलनेत तब्बल २५ पट अधिक म्हणजे १ लाख ७० हजार मेट्रिक टन एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलादाचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे वांद्रे-वर्सोवा सागरी सेतू पोलादाच्या माध्यमातून भक्कम होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.

Mumbai News
Mumbai News: सिद्धिविनायक मंदिरात बनावट व्हीव्हीआयपी दर्शनाचे रॅकेट; पोलिसांकडून कारवाई

एमएसआरडीसीकडून वांद्रे-वर्सोवा असा सागरी सेतू उभारला जाणार आहे. त्यामध्ये ९.६ किलोमीटर लांबीचा मुख्य सी-लिंक आणि सुमारे सात किलोमीटर लांबीचे चार कनेक्टर असणार आहेत. या पुलाला जुहू येथे जवळपास एक किलोमीटर समुद्रात १२० मीटर लांबीचे चार पोलादी स्पॅन असणार आहेत. त्याखालून स्थानिक मच्छीमारांच्या बोटी सहजपणे जाऊ शकणार आहेत.

तसेच वादळ, वारा आणि समुद्राच्या लाटांशी सी-लिंकने सहजपणे दोन हात करावेत म्हणून प्रत्येक किलोमीटरसाठी जवळपास १० हजार मेट्रिक टन स्टील बांधकामात वापरले जाणार आहे. त्याचबरोबर ९० लाख क्युबिक चौरस मीटर काँक्रीट वापरले जाणार असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

दरम्यान, ३२४ मीटर उंचीच्या आयफेल टॉवरसाठी ७ हजार मेट्रिक टन एवढे लोखंड वापरण्यात आले आहे.

Mumbai News
Mumbai News: मिठी नदीच्या रुंदीकरणातील अडथळा अखेर झाला दूर; ६७२ झोपड्या हटवल्या

चार कनेक्टर


दक्षिण मुंबईतून पश्‍चिम उपनगरात जाणाऱ्या वाहनांची गैरसोय टाळण्यासाठी वांद्रे-वर्सोवा सी-लिंकला चार कनेक्टर असणार आहेत. त्यामुळे सी-लिंकवरून सहजपणे वाहनधारकांना पश्‍चिम द्रुतगती महामार्गावर पोहोचता येणार आहे.
- वांद्रे कनेक्टर - १.७ कि. मी.
- वॉटर्स क्लब रोड (कार्टर रोड) - १.८ कि. मी.
- जुहू तारा रोड - २.८ कि. मी.
- वर्सोवा - १.८ कि. मी.

Mumbai News
Mumbai News: मुंबईत गारवा वाढला मात्र प्रदूषणही निवळले!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.