Mumbai Metro: वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावरील सात स्थानकांचा होणार कायापालट!
Mumbai News: वडाळा-कासारवडवली मेट्रो चार मार्गांवरील सात स्थानकांचा गोदरेज कंपनीकडून कायापालट केला जाणार आहे.
एमएमआरडीएने गारोडिया नगर, पंतनगर, लक्ष्मीनगर, श्रेयस सिनेमा, गोदरेज कंपनी, विक्रोळी मेट्रो आणि सूर्या नगर या स्थानकांचे आर्किटेक्चरल फिनिशिंग आणि इतर सोयी-सुविधा, सजावटीचे काम करण्यासाठी नुकतेच टेंडर मागवले होते. त्यात गोदरेज कंपनीने बाजी मारली आहे.
मेट्रो- ४ मार्ग सुमारे ३३ किलोमीटर लांबीचा असून येथे ३२ स्थानके आहेत. त्यापैकी वडाळ्याच्या दिशेकडून सात स्थानकांच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
त्यामुळे तेथे स्थानकाचे छत उभारणे, स्वयंचलित जीने लावण्याबरोबरच प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळ्या सुविधा उभारण्याकरिता एमएमआरडीएने टेंडर काढले होते.
त्यामध्ये गोदरेज, इगल इन्फ्रा, लॅन्डमार्क कार्पोरेशन या तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये सर्वात कमी २५१.२ कोटी रुपये एवढी सर्वात कमी बोली गोदरेजने लावली आहे.
त्यामुळे त्यांना काम मिळणार असल्याचे निश्चत झाले आहे. पुढील तीस महिन्यांत त्यांना काम पूर्ण करावे लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.