Mumbai News: ‘एसएनडीटी’मध्ये मोडी लिपी कार्यशाळा
Mumbai News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून मुंबईतील एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये नुकतीच ‘मोडी लिपी’ प्रचार आणि प्रसार ही एक दिवसाची कार्यशाळा नुकतीच पार पडली. या कार्यशाळेला विद्यार्थिनी, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी भरभरून सहभाग नोंदवला.
विद्यापीठातील इतिहास विभाग, पुराभिलेख संचालनालय तसेच एसएनडीटी कला श्री. चं. भो. वाणिज्य व विज्ञान महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुजितकुमार उगले यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.
या कार्यशाळेत मोडी लिपीतील अक्षर वळण, बाराखडी आणि संक्षिप्त रूपे याची माहिती देण्यात आली. पुराभिलेख संचालनालयाच्या सायली पिंपळे, महेश राजपूत आणि प्रतीक्षा कदम यांनी मार्गदर्शन केले. डॉ. रामकुमार प्रधान यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यशाळेमुळे आम्हाला मोडी लिपी शिकायला मिळाली, आम्हाला ऐतिहासिक पत्रे वाचून अर्थबोध होईल, अशी प्रतिक्रिया बहुतांश विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
कार्यशाळेत ७० जण सहभागी झाले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता. महाविद्यालयातील हिंदी, गुजराती, इंग्रजी, मराठी अशा सर्व माध्यमातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मुलींनी या कार्यशाळेत भाग घेतला होता.
या कार्यशाळेत काहींनी आपल्या घरातील मोडी लिपीतील जुनी कागदपत्रे वाचता यावी, म्हणून सहभाग घेतला तर इतिहासविषयक संशोधनात उपयोग होईल, म्हणून अनेक विद्यार्थिनींनी नाव नोंदवले.
कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद मिळाला, हे बघता विद्यापीठात मोडी लिपीवर विशेष अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
- डॉ. जास्वंदी वांबूरकर, प्राचार्या आणि इतिहास विभागप्रमुख
पेशवे काळातील पुस्तके वाचत होतो; पण मोडी लिपी कळत नव्हती. आता या कार्यशाळेत आल्यामुळे मला बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
- आदेश शिंदे, रुईया कॉलेज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.