Mumbai Local News
Mumbai Local NewsSakal

Mumbai Local News: लोकलमध्ये होते चुकीची अनाऊन्समेन्ट; प्रवाशांचा गोंधळ

Published on

Thane News : पुढील स्टेशन कोणते, याची प्रवाशांना माहिती व्हावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने लोकल गाड्यांच्या डब्यात स्थानकांची नावे दर्शविणारे डिजिटल इंडिकेटर बसवले आहेत.

पण या इंडिकेटरमध्ये दाखविल्या जाणाऱ्या शब्दांमध्ये अनेक चुका असल्याचे दिसून येत आहेत. काही स्थानकांची नावे तर चुकीच्या पद्धतीने दाखवली जात आहेत. त्यामुळे या इंडिकेटरच्या भरवशावर न राहता पुढील स्थानक कोणते, हे प्रवाशांना स्वतःच लक्षात ठेवून योग्य स्टेशनवर उतरण्याची काळजी घ्यावी लागत आहे.

Mumbai Local News
Mumbai News: ‘एसएनडीटी’मध्ये मोडी लिपी कार्यशाळा

रेल्वेची लोकल सेवा ही मुंबईकरांची धमनी मानली जाते. कमी खर्चात आणि इच्छितस्थळी लवकर पोहोचण्यासाठी प्रवाशांकडून या सेवेला प्राधान्य दिले जाते. सकाळ आणि संध्याकाळी तर कर्मचाऱ्यांची डब्यांमध्ये तुडुंब गर्दी असते.

अशावेळी प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्टेशनवर उतरणे सोयीचे व्हावे, यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रत्येक डब्यांमध्ये इंडिकेटर बसवले आहेत. या इंडिकेटरच्या माध्यमातून पुढील स्टेशन कोणते याची माहिती काही मिनिटे आधीच मिळते.

तसेच ऑडिओच्या माध्यमातूनही मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतून तशी घोषणा केली जाते; मात्र काही स्थानकांबाबत रेल्वेकडून गोंधळ घालण्यात आला आहे. ऑडिओमध्ये घोषित केले जाणारे नाव आणि इंडिकेटरवर दर्शवले जाणारे नाव यात तफावत असते.

Mumbai Local News
Ranji Trophy 2024 Mumbai : लॉर्ड शार्दुलचा शतकी तडाखा अन् तमिळनाडूचा डावाने पराभव, मुंबई पोहचली 42 व्या विजेतेपदाच्या वेशीवर

सोबतच अनेक स्टेशनच्या नावांमध्ये चुकाही दिसतात. रोज प्रवास करणारे प्रवासी या इंडिकेटरच्या भरवशावर न राहता त्यांच्या अनुभवानुसार ते योग्य स्थानकावर उतरतात; परंतु इंडिकेटरवर अवलंबून राहणाऱ्या प्रवाशांची मात्र फजिती होते.

मी रोज ठाणे ते रबाळे असा प्रवास करतो. स्टेशनचे नाव रबाळे असे आहे; पण डब्यात इंडिकेटरवर ते चुकीच्या पद्धतीने दिसते. माझा रोजचा प्रवास आहे म्हणून मला स्टेशन आल्यावर वेळेत उतरायला त्रास होत नाही; पण अनेकजण नवखे प्रवासी असतात. ते संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळते. ऐरोलीबाबत असेच चित्र असते. अनेक प्रवासी चुकतात.


- प्रदीप देसाई, प्रवासी

Mumbai Local News
Mumbai Health News: कोरोनानंतर मुलांमध्ये लठ्ठपणाच्या समस्येत वाढ

ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानकांची चुकीची नावे


स्थानकाच्या फलकावरील मूळ नाव - ऐरोली, डब्यात इंडिकेटरवर दाखवले जाणारे नाव - ऐरावली
मूळ नाव - रबाळे, डब्यात इंडिकेटरवर दिसणारे नाव - राबाडा
मूळ नाव - कोपरखैरणे, डब्यात इंडिकेटरवर दाखवले जाणारे नाव - कोपरखैर्ना

Mumbai Local News
Mumbai Metro: वडाळा-कासारवडवली मेट्रो मार्गावरील सात स्थानकांचा होणार कायापालट!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.