Mumbai Local News: लोकल लेट होण्याचे टेंशन होणार कमी; पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा मार्ग मोकळा
Mumbai News प्रवास अधिक सुकर व्हावा, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते कुर्ला स्थानकांदरम्यान पाचवी-सहावी मार्गिका २०२१ पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करण्यात आली होती.(mumbai local News)
मात्र भूसंपादनाच्या अडचणीमुळे हा मार्ग रखडून त्याचा खर्च भरमसाट वाढला. आता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाल्याने हा प्रकल्प वेगाने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळील १ हजार २६३ चौरस मीटरपेक्षा जास्त जमीन राज्य सरकारकडून यासाठी संपादित करण्यात येणार आहे.(railway news)
मध्य रेल्वे मार्गावर दिवसागणिक प्रवाशांची गर्दी वाढत असून लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकलचे वेळापत्रक बिघडत आहे. उपनगरी रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी कुर्ला ते सीएसएमटीपर्यंत पाचवी-सहावी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २००८-०९ मध्ये या प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. तेव्हा या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ८९० कोटी रुपये होता; मात्र भूसंपादनाच्या अडचणींमुळे अनेक वर्षे हा प्रकल्प खोळंबला आहे.
२०१४ मध्ये देशासह राज्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले. केंद्रात मोदी तर राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतर सीएसएमटी ते कुर्लादरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतला आहे. परळ रेल्वे स्थानकाबाहेर पंतप्रधान मोदींचा फोटो, मार्गिकेची रूपरेषा, अंदाजित खर्च आणि प्रकल्प पूर्ण करण्याची तारीख जाहीर केली. वर्ष उलटून गेले तरी हे काम अद्याप पूर्णत्वास आलेले नव्हते. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च एक हजार ३३७ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे.(mumbai csmt station)
दहा हजार चौरस मीटर जमीन आवश्यक
मस्जिद स्थानकाजवळ सीएसएमटी आणि भायखळा परिसरात जमीन आहे. या जागेची मोजणी सुरू आहे. दोन नवीन मार्ग जोडण्याचा पहिला टप्पा कुर्ला ते परळ, तर दुसरा टप्पा परळ-सीएसएमटी दरम्यान आहे. कुर्ला ते परळच्या पट्ट्यात रेल्वेला दहा हजार चौरस मीटर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी सहा हजार चौरस मीटर जमीन आधीच संपादित केली आहे. उर्वरित जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. याशिवाय कुर्ल्यातील स्वदेशी मिलमधील जमिनीचे संपादन सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.(local geting late)
असा होईल फायदा
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्लादरम्यान पाचवी, सहावी मार्गिका स्वतंत्र नाही. त्यामुळे जलद लोकलच्या उपलब्ध दोन मार्गिकांवरूनच मेल, एक्स्प्रेस गाड्या धावतात. त्यामुळे लोकल सेवा विस्कळित होते. नियमित वेळापत्रक कोलमडून पडत असल्याने स्वतंत्र मार्गिका सुरू करण्याचे धोरण आखले. हा मार्ग पूर्ण झाल्यास लोकलचा वेग वाढून मुंबईकरांचा प्रवास जलगतीने होईल. लोकल फेऱ्यांची संख्येत भर पडेल.(mumbai maharashtra)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.