Crime News: फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पोलिस निरीक्षकाचीच झाली फसवणूक

Crime News: फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पोलिस निरीक्षकाचीच झाली फसवणूक

खारघर पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे | Kharghar police have registered a case of embezzlement along with cheating
Published on

Mumbai News: खारघरमध्ये राहणाऱ्या एका पिता-पुत्राने फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने मुंबई पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका पोलिस निरीक्षकाची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

तुकाराम मुळे व गौरव मुळे अशी या पिता-पुत्रांची नावे असून या दोघांनी अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. खारघर पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे.(crime news navi mumbai )

Crime News: फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पोलिस निरीक्षकाचीच झाली फसवणूक
Nashik Crime News : दोघींचे मोबाईल नेले खेचून; स्नॅचर्सला आळा घालण्याचे पोलिसांसमोर आव्हान

या प्रकरणात फसवणूक झालेले पोलिस निरीक्षक मुंबई पोलिस दलात गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत आहेत. २०१६ मध्ये त्यांना नवीन घर विकत घ्यायचे होते. त्यावेळी तुकाराम गंगाराम मुळे व त्यांचा मुलगा गौरव मुळे हे दोघेही पनवेलच्या करंजाडे सेक्टर-६ भागात संदीप कॉर्नर नावाने इमारतीचे बांधकाम करत असल्याची माहिती या पोलिस निरीक्षकला मिळाली होती.

त्यावेळी त्यांनी तुकाराम मुळे यांच्या खारघर येथील आदित्य एन्टरप्रायजेसच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुळे पिता-पुत्रांनी साडेबारा टक्के योजनेतील प्लॉटवर इमारतीचे बांधकाम करत असल्याचे सांगितले होते.(police crime news)

Crime News: फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पोलिस निरीक्षकाचीच झाली फसवणूक
Jalgaon Crime News : 'ड्रग्ज' विक्रीच्या माहितीवरून शाहुनगरात धाडसत्र; एमडी ड्रग्जसह महिला पसार

तसेच त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यात आल्याचे तसेच दीड वर्षामध्ये ऑगस्ट २०१८ पर्यंत फ्लॅटचा ताबा देणार असल्याचे या निरीक्षकाला सांगितले होते. २३ लाख रुपयांमध्ये फ्लॅटच्या खरेदी- विक्रीचा त्यांच्यात व्यवहार ठरला. पोलिस निरीक्षकाने तुकाराम मुळे यांना एक लाख रुपयांची रक्कम देऊन फ्लॅटची बुकींग केली. त्यानंतर या पोलिस निरीक्षकाने मुळे पिता-पुत्राला आणखी आठ लाख रुपये चेकद्वारे दिले. (navi mumbai crime )

मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून रजिस्ट्रेशन करून देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.(crime news mumbai)

Crime News: फ्लॅट विकत देण्याच्या बहाण्याने पोलिस निरीक्षकाचीच झाली फसवणूक
Nashik Crime: सहलीदरम्यान शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; सरकारवाडा पोलिसात ॲट्रोसिटी, पोक्सोअन्वये गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.