Mumbai News: गोखले पुलाची मार्गिका सुरू; पण कोंडी ‘जैसे थे’
Mumbai News: अंधेरीतील गोपाळ कृष्ण गोखले पुलाची एक मार्गिका नुकतीच सुरू झाली; परंतु यामुळे अंधेरीतील वाहतूक कोंडीवर जास्त फरक पडलेला नाही. मिलन सबवे वगळता इतर भागातील वाहतूक कोंडी ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.
अंधेरीत एस. व्ही. रोडसह लिंक रोडवर नेहमीच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा विचार करता अंधेरी पश्चिम येथील वर्सोवा, चार बंगला, सात बंगला, यारी रोड, डी. एन. नगर, स्वामी समर्थ नगर, जुहू आदी परिसरातून पश्चिम द्रुतगतीमार्गे बोरिवली व दक्षिण मुंबईत जाण्यासाठी गोखले पूल हा सर्वात जवळचा मार्ग ठरतो.
त्यामुळे या पुलावरून दररोज किमान सहा ते आठ हजार वाहनांची ये-जा होते. बसगाड्यांसह रिक्षा, टॅक्सी आणि मोठ्या वाहनांसाठीही हा मार्ग सोयीचा आहे; परंतु गोखले उड्डाणपूल बंद झाल्यानंतर जुहू आणि विलेपार्ले भागात वाहतूक कोंडीचा सामना आजही करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीस कारण की...
- अंधेरीत खासगी वाहनांची संख्या अधिक
- दोन मेट्रो आणि एक रेल्वे स्थानकातील गर्दी
- खासगी कंपन्यांमुळे होणारी गर्दी
- रिक्षा, टॅक्सींचा अधिक वापर
- व्यावसायिक दुकाने, अस्थापने
गोखले उड्डाणपुलावरून प्रवास करणे खूप जिकिरीचे आहे. योग्य रीतीने वाहतूक व्यवस्थापन आणि सिग्नल वेळ व्यवस्थापन न केल्याने सतत वाहतूक कोंडी असते.
- रिषभ हेगडे, वाहनचालक
गोखले उड्डाणपूल सुरू होऊनही अंधेरी पश्चिमेत नवीन गोंधळ निर्माण झाला आहे. बर्फीवाला उड्डाणपुलापासून रामजारुखा जंक्शनपर्यंत वाहतूक ठप्प होते. आपण ‘अंधेरी’चे नाव बदलून ‘न संपणारा गोंधळ’ असे करू शकतो का?
- सुनील मर्चंट, वाहनचालक
अंधेरी ते नवी मुंबई असा प्रवास करण्यासाठी आम्हाला एवढा वेळ लागतो. कारण सरकार २०० मीटरचा गोखले पूल नीट बांधू शकत नाही. त्यामुळे आपण अद्याप अभियांत्रिकी तंत्रज्ञानाबद्दल बोलू नये. तसेच अशा घडामोडींमध्ये आपण २० वर्षे पाठीमागे आहोत.
- संजय गांगुर्डे, रहिवासी
गोखले पूल तोडल्यानंतर तो पुन्हा बांधण्यापूर्वी काही वर्षे एक मार्गिका चालू ठेवली होती. त्या ठिकाणी नेहमी वाहतूक ठप्प असते. तो भाग वाहतूक कोंडीमुक्त करावा अशी अपेक्षा होती; मात्र स्थिती ‘जैसे थे’ आहे.
- अजित वाघ, रहिवासी
अंधेरी परिसरात दोन मेट्रो आणि एक रेल्वे स्थानक यामुळे दोन लाख लोकांची ये-जा असते. तसेच या भागात खासगी वाहने जास्त आहेत. त्यामुळे या भागात वाहतूककोंडी जास्त होत आहे.
- डॉ. शंकर विश्वनाथ, वाहतूकतज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.