Mumbai News Tempreture
Mumbai News Tempreture sakal

Mumbai News: दिवसा ऊन अन् रात्री थंडी; आजारी पडण्याचे प्रमाण वाढले

Mumbai Tempreture News: उन्हाळ्याची चाहूल.. वातावरणात बदल
Published on

Mumbai Tempreture News: गेल्या आठवडाभरापासून दिवसा कडक ऊन आणि रात्रीच्या वेळी थंडी पडत आहे. त्यामुळे वातावरणात बदल होत असून ताप, सर्दी तसेच खोकल्यासारखे व्हायरल आजार वाढल्याचे दिसून येत आहे.

Mumbai News Tempreture
Mumbai Police News: अभिनेत्रीचा हरवलेला मोबाईल शोधला

पुढील काही दिवस हवामानातील चढ-उताराची स्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.


गेल्या काही दिवसांपासून दिवसाचे तापमान आणि रात्रीचे तापमान यात मोठ्या प्रमाणावर फरक असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे दिवसा उकाडा आणि रात्री थंडी पडत असून असे विषम हवामान सध्या पनवेल, उरण विभागात अनुभवायला मिळत आहे.

Mumbai News Tempreture
Mumbai Crime News: मुंबईत पोलिसांनी जप्त केला तब्बल 'इतका' किलो गांजा!

विषम हवामानामुळे गेल्या काही दिवसांत साथीचे आजारही बळावले आहेत. गेल्या काही दिवसांत तापमानातील फरक वाढला आहे. दुपारच्या सुमारास उन्हाची दाहकता, तर रात्रीच्या वेळी थंडी जाणवत आहे. वातावरणातील हा बदलाचा लपंडाव मानवी आरोग्यासाठी त्रासदायक तर पिकांसाठी घातक ठरत आहे

डिसेंबर व जानेवारी महिन्यात काही दिवस पारा चांगलाच खाली होता. त्यामुळे आठ ते दहा दिवस थंडी जाणवली होती. दिवसा व रात्रीच्या तापमानात सुमारे दहा ते बारा अंशांपर्यंतचा फरक जाणवत आहे.


साथीचे आजार बळावले


हवामानातील या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या विषमतेमुळे व्हायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांसोबतच अन्य काही साथीचे रोग बळावले आहेत. पुढील काही दिवस अशीच परिस्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.(Mumbai Helth News )

Mumbai News Tempreture
Mumabi मध्ये साकार होणार, तिसरी मुंबई, नेमका काय आहे प्लॅन | Sakal | Mumbai news

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.