Railway Aditi Tatkre News
Railway Aditi Tatkre Newssakal

Railway News: 'या' कारणासाठी मंत्री आदिती तटकरेंनी थांबवले रेल्वेचे 'ते' काम!

Aditi Tatkre : ग्रामस्थ आक्रमक; मंत्री आदिती तटकरेंकडून काम बंद करण्याचे आदेश
Published on

Roha News: रेल्वे प्रशासनाकडून जमीन संपादित न करता शेतकऱ्यांच्या जागेतून संरक्षण भिंतीचे काम सुरू केल्याने तसेच ग्रामदैवत बापदेव महाराज मंदिराच्या दर्शनी भाग बंद करण्याचा प्रताप केल्याने संतापलेल्या अष्टमीकर जनतेने आक्रमक होत हल्लाबोल केला.

या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी खासदार सुनील तटकरे व नामदार आदिती तटकरे यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन जोपर्यंत जिल्ह्याधिकारी व रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक होत नाही. तोपर्यंत सदर काम तातडीने बंद करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले आहे. (aditi Tatkre)

Railway Aditi Tatkre News
Railway News: होळी निमित्त रेल्वेचा महत्वाचा निर्णय; या मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन!

रोहा रेल्वे स्‍थानकाच्‍या अष्टमी गाव हद्दीत काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने सीमेवर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू केले आहे. संपादित जागेत संरक्षण भिंतीचे काम झाल्यानंतर लगतच्या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता व जमीन संपादन न करता थेट भिंतीच्या बांधकामासाठी खोदकाम सुरू केले. नियोजित जागेपेक्षा १८ मीटर आत खोदकाम केल्याने शेतकरी ग्रामस्थांनी हल्लाबोल केला व या कामाला विरोध केला.

माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या नेतृत्वाखाली कामबंद मोहीम हाती घेण्यात आली. या दरम्यान मंत्री आदिती तटकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची सविस्तर माहिती घेतली. सदर जागा प्रस्‍ताविक असून संपादित नाही. त्‍यामुळे भूसंपादन नसताना व शेतकऱ्यांना याविषयी कोणतीही पूर्वकल्पना न देता काम सुरू केल्याची बाब शेतकऱ्यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिली.(Railway News)

Railway Aditi Tatkre News
Railway News: भुसावळ- मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांना मुदतवाढ

रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभाराबद्दल यावेळी तटकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून लवकरच जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असल्‍याचे सांगितले.(railway News)

तसेच तोपर्यंत काम थांबविण्याचे आदेश आदिती तटकरे यांनी दिले. या वेळी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, मुख्याधिकारी पंकज भुसे, रेल्वे खात्याचे असिस्टंट इंजिनीअर संजू सिंग, डिव्हिजनल इंजिनीअर पी. डी. वाडेकर, नगरपालिका अभियंता सुधीर भगत, अष्टमी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष महादेव साळवी, मुस्लिम समाज अध्यक्ष शफी पानसरे, मयूर दिवेकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Railway Aditi Tatkre News
Railway News: रूळ ओलांडण्याला बसणार आळा; रेल्वेने घेतला महत्वाचा निर्णय!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.