lok sabha election seat dispute shinde group amit shah
lok sabha election seat dispute shinde group amit shahSakal

Lok Sabha Election : महायुतीच्या १५ जागांचा तिढा; मित्र पक्षांच्या मागण्या मोठ्या; शिंदेंची अमित शहांसोबत चर्चा

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तब्बल १८ जागांवर शिंदे सेनेने आणि १० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केल्याचे समजते.
Published on

Mumbai News : महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील तब्बल १८ जागांवर शिंदे सेनेने आणि १० जागांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केल्याचे समजते. या मित्रांना नाराज न करता भाजपने अधिक जागा जिंकणे फायद्याचे असल्याचे रात्री उशीरापर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा समजावून सांगत होते.

मित्रपक्षांनी केलेले दावे अवाजवी असून त्यामुळे सुमारे १५ जागांबाबत तिढा निर्माण झाल्याचे विश्वसनीयरित्या समजते. अमित शहा यांनी मुंबई विमानतळावर पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कुठे भेटायचे याचे निर्देश दिले. त्यानंतर लगेचच यासंबंधातल्या बैठका सुरु झाल्या.

बारामती लोकसभा मतदारसंघावर अजित पवार यांच्याशी चर्चा झाली. त्या वेळी राष्ट्रवादीला हव्या असलेल्या अन्य जागांवरही प्रारंभिक चर्चा झाल्याचे समजते. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन ज्या खासदारांनी महायुतीत प्रवेश केला, त्यांना जागा देणे आपला शब्द असल्याचे शिंदे यांनी सांगितल्याचेही समजते. त्यांचे प्रतिपादन शहा यांनी बंद दरवाजाआड ऐकून घेतले असेही सांगण्यात येत होते.

परिस्थिती योग्य प्रकारे समजावून सांगण्यावर भाजप भर देणार आहे असेही समजते. रत्नागिरी, मुंबईतील तीन, विदर्भातील ३ तसेच मराठवाड्यातील ४ जागांवर तिढा आहे. उद्या बुधवारी (ता. ६) सकाळी पुन्हा एकदा तिन्ही नेत्यांशी अमित शहा सविस्तर चर्चा करण्याची शक्यता आहे. मित्र गटांच्या मागण्या मान्य करणे शक्य नसले तरी त्यामागचे कारण त्यांना समजावून सांगण्यावर भर दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.