Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली  कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ

Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ

Published on


मुंबई, ता. ९ : भारतीय रेल्वेला प्रवासी सेवेतून, मालवाहतूक, पार्सल वाहतूक करून महसूल मिळतो. यासह वेगवेगळ्या दंडात्मक कारवाईद्वारे महसूल प्राप्त होतो. तसेच भारतीय रेल्वेमध्ये भाडेविरहित (नॉन फेअर) महसुलात वाढ केली जाते. (non-fair scheme railway)

Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली  कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ
Railway News: फुकट्या प्रवाशांकडून १५७.१२ कोटींची दंड वसुली

यात मध्य रेल्वेने २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११०.९९ कोटींची कमाई करत सर्व क्षेत्रीय रेल्वेमध्ये नॉनफेअर महसुलात प्रथम स्थान पटकावले आहे. याशिवाय प्रवासी संख्येतही पहिला क्रमांक कायम राखून विजयी मालिका मध्य रेल्वेने सुरू ठेवली आहे.

२०२३-२४ च्या (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४ पर्यंत) मध्य रेल्वेने विविध मार्गांनी नॉनफेअर योजनेतून ११०.९९ कोटी उत्पन्न मिळवले. मागील वर्षाच्या याच कालावधी मध्ये ७८.८६ कोटी रुपयांच्या उत्पन्न तुलनेत यंदा ४०.७४ टक्क्यांची आश्चर्यकारक वाढ मिळवली आहे.

Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली  कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ
Railway News: रेल्वेत नोकरीच्या आमिषाने वकिलासह पाच जणांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर आणि पनवेल स्थानकांवर ५८.९९ लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या आणि बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांच्या करारासह फेब्रुवारी-२०२४ मध्ये ९.८३ कोटी रुपयांच्या वार्षिक परवाना शुल्कासह ई-लिलावाद्वारे ५ वर्षांच्या कालावधीसाठी दिलेल्या १२ निविदांचा समावेश यात आहे.

यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस येथे बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर वातानुकूलित शयनगृह आणि विश्रांतीगृह, बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तसेच व्यवस्थापन यासाठी पाच वर्षांसाठी असलेल्या वार्षिक ६३.६३ लाख रुपयांच्या कराराचाही समावेश आहे.

Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली  कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ
Railway News: होळी निमित्त रेल्वेचा महत्वाचा निर्णय; या मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन!

मध्य रेल्वे पहिल्या स्थानावर


२०२३-२४ या आर्थिक वर्षात (एप्रिल-२०२३ ते फेब्रुवारी-२०२४) उल्लेखनीय १,४४९.५३ दशलक्ष प्रवाशांची वाहतूक केली आहे, जी मागील वर्षीच्या याच कालावधीतील १३३३.५७ दशलक्षच्या तुलनेत ८.७० टक्य्यांनी वाढली आहे.

त्यामुळे सर्व विभागीय रेल्वेमध्ये मध्य रेल्वे पहिल्या स्थानावर आहे. तसेच प्रवासी वाहतुकीतून ६७००.८० कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीतील रु. ५,८५५.८१ कोटीच्या तुलनेत १४.४३ टक्के अधिक आहे.

Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली  कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ
Railway News: भुसावळ- मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांना मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.