Railway News
Railway Newssakal

Railway News: होळी निमित्त रेल्वेचा महत्वाचा निर्णय; या मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन!

Mumbai Holi Special News: या होळी विशेष गाड्यांचे आरक्षण ८ मार्च २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेस्थळावर सुरू होणार आहे.
Published on


मुंबई, ता. ६ : होळीसाठी गावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद-मडगावदरम्यान वसई रोडमार्गे विशेष भाड्यावर होळी स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ट्रेन क्रमांक ०९४१२ अहमदाबाद-मडगाव विशेष अहमदाबादहून १९ आणि २६ मार्च २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५.३० वाजता मडगावला पोहोचेल. तसेच ट्रेन क्रमांक ०९४११ मडगाव-अहमदाबाद स्पेशल ही मडगावहून २० आणि २७ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता अहमदाबादला पोहोचेल. (railway News holi Maharashtra)

Railway News
Konkan Railway News: मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनचा विस्ताराला विरोध

या दोन्ही होळी स्पेशल रेल्वे गाड्या वडोदरा, सुरत, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी स्थानकांत थांबतील, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

या होळी विशेष गाड्यांचे आरक्षण ८ मार्च २०२४ पासून भारतीय रेल्वेच्या सर्व आरक्षण केंद्रांवर आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेस्थळावर सुरू होणार आहे.(Latest Railway News )

Railway News
Railway News: भुसावळ- मुंबई सेंट्रल आणि पुणे-इंदूर दरम्यान विशेष गाड्यांना मुदतवाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.