prakash ambedkar modi
prakash ambedkar modi sakal

Loksabha Election: मोदींना संधी दिल्यास देश कर्जात बुडेल; प्रकाश आंबेडकरांचा दावा

Prakash Munde: वंचित बहुजन आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश घरत यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मुस्लिम कार्यकर्ते, मारवाडी, मातंग, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला.
Published on

Navi Mumbai News: आरएसएसप्रणीत मोदी सरकार सर्वसामान्याला देशोधडीला लावत आहे. रिझर्व्ह बँकेने देश कर्जात बुडाला असल्याचे सांगितले आहे.

भाजपला पुन्हा निवडून दिल्यास २०२६ मध्ये देश कर्जात बुडेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.

नवी मुंबईच्या नेरूळ येथील रामलीला मैदानात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्तापरिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी आंबेडकर बोलत होते.


--

prakash ambedkar modi
Loksabha Election : महायुतीची खलबते होणार दिल्लीत; महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला नाही

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मोदी माझा देश, माझा परिवार असे भाजपचे लोक जे सांगत आहेत ते अत्यंत खोटारडे आहे. विरोधी पक्ष मोदींचा खोटारडेपणा उजेडात आणू शकत नाहीत. देशातील आताची परिस्थिती पाहता कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. मोदी सरकार सर्वसामान्याला देशोधडीला लावत आहे.

पुन्हा एकदा भाजप निवडून आल्यास २०२६ मध्ये देश कर्जात बुडालेला असेल, अशी टीका त्यांनी केली. असे होऊ द्यायचे नसेल, भारतीय लोकशाहीला, उद्याच्या पिढीच्या स्वातंत्र्याला वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी वंचित बहुजन आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे जगदीश घरत यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. मुस्लिम कार्यकर्ते, मारवाडी, मातंग, आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला.

prakash ambedkar modi
Loksabha Election : छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपच लढविणार ; अमित शहांचे स्पष्ट संकेत

पंतप्रधानांनी ढोकळा खायला गुजरातला नेले का?


मोदी हे देशाचे नाही तर गुजरातच्या पंतप्रधान वाटतात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. भारत भेटीला आलेले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, जपान, केनियाचे पंतप्रधान यांना गुजरातला नेले. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीला दूर करत मोदींनी बाहेरून आलेल्या पंतप्रधानांना ढोकळा खायला नेले का, अशी टीका त्यांनी केली.

‘सर्वसामान्यांच्या दारात ईडी दिसेल’


५० कोटी संपत्ती असणाऱ्या २४ लाखांहून अधिक कुटुंबांनी २०१४ ते २०२४ या दहा वर्षांच्या कालावधीत देशाचे नागरिकत्व सोडले. १९५० ते २०१४ मध्ये फक्त ७००० कुटुंबे परदेशात गेली होती. आता बाहेर गेलेले लोक कारवाईपोटी गेल्याची टीका आंबेडकर यांनी केली. तसेच, येणाऱ्या काळात सर्वसामान्यांच्या दारात ईडी उभी राहील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

prakash ambedkar modi
Loksabha Election : शाहू महाराज यांच्या नावावर एकमत; धंगेकर, वाघेरे यांना उमेदवारी शक्य; दोन दिवसांत घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.