Women Day Special: शिवडीत तरुणी चालवते ‘क्लाऊड किचन’; आवड बनले करिअर
Mumbai News: नोकरी किंवा व्यवसाय करून पैसे कमावणे, कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे ही दैनंदिन जीवनातील गरज आहे; मात्र गरज आणि आवड हे दोन्ही एकत्र आणून आपण प्रामाणिक कार्य केल्यास आपली आवड ही आपले करिअर घडवू शकते, हे पूजा गोपाळ डाफळे या तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. (mumbai Womens )
भाऊ राजेश डाफळेच्या सहकार्याने काेरोनापासून पूजा ‘क्लाऊड किचन’ चालवत आहे. अाजच्या महिला दिनानिमित्त पूजाच्या या प्रवासाचा घेतलेला थोडक्यात आढावा. एमबीए-एचआर ही पदवी घेतलेल्या पूजाने अवघ्या २७ व्या वर्षी घरूनच खाद्यपदार्थ बनवण्यास सुरुवात केली.(Women News)
राजापूर, लांजा तालुक्यातील डाफळेवाडी येथे तीस वर्षांपूर्वी फारशा सोयी-सुविधा नसलेल्या गावात पूजा गोपाळ डाफळे यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून तिने एमबीए- एचआर ही पदवी मिळवली. वडील शेतकरी असल्यामुळे घरची परिस्थिती बेताचीच होती. वेगवेगळ्या प्रकारचे स्वयंपाक, रुचकर पदार्थ तयार करण्याची नैसर्गिक कला तिच्यात होती. नावीन्यपूर्ण पदार्थ तयार करण्याचा एक छंदच तिला जडला होता.(rajapur news)
मार्च २०२० पासून देशात लॉकडाऊन लागल्यानंतर सगळीकडे ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धत सुरू झाली. या संधीचा फायदा पूजाने उचलला. जिद्दीने तिने ‘क्लाऊड किचन’ सुरू केले. लॉकडाऊन असूनही तिने नाहर बिजनेस पार्कमध्ये एका डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम केले. २०२२ मध्ये आयसीआयसीआय लोंबार्डमध्ये एचआर रिक्रूटर म्हणून रुजू झाल्या. पण, सुगरणीची कला तिला स्वस्थ बसू देत नव्हती.
त्यानंतर नोकरीचा राजीनामा देत विक्रोळी कन्नमवार नगर नंबर २ मध्ये भाड्याने जागा घेऊन स्वतःचे किचन सुरू केले. पहिल्याच प्रयत्नात जवळपास ८०० किलो दिवाळीचा फराळ तयार करून आपल्या अंगी असलेल्या सामर्थ्याचे दर्शन घडविले. त्यांच्या फराळाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. परदेशातूनदेखील फराळाला मागणी आली.(mahashtra News)
घाऊक ऑडर घेऊन सगळ्या प्रकारचे पदार्थ त्यांनी बनवायला घेतले. २४० ते ३०० जेवणाचे बॉक्स बनवून मागणी तसा पुरवठा करायचा व कुठेही कमी पडायचे नाही, हे प्रयत्न चालू ठेवले. विविध प्रकारच्या समारंभात म्हणजेच साखरपुडा, मुंज, वाढदिवस, लग्न आदी समारंभासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीच्या नावीन्यपूर्ण डिशेस बनविण्यात त्यांचा हातखंडा आहे.(mumbai News)
आपली नावीन्यपूर्ण पदार्थ बनवण्याची कला खवय्यांपर्यंत कशी पोहोचवायची, हे माझ्यापुढे आव्हान होते. हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याची जिद्द माझ्यात होती. ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने सारे शक्य झाले.(maharashtra News)
- पूजा डाफळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.