Sanjay Rathod: ७५० कोटींचा भूखंड संजय राठोडांच्या घशात? काँग्रेसचा मोठा आरोप
मुंबईत येणाऱ्या बंजारा समाजातील विद्यार्थी, रुग्ण, नागरिक यांच्या निवासासाठी नवी मुंबईत सिडकोमार्फत एक भूखंड विनामूल्य मंजूर करण्यात आला होता.
परंतु राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मालकीची खासगी संस्था जाणीवपूर्वक रामराव महाराजांचे नावाने असल्याचे भासवून हा भूखंड वैयक्तिक ट्रस्टच्या नावावर करून घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या संस्थेने सिडकोच्या कार्यक्षेत्रात शासकीय भूखंड मिळावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बेलापूर, नवी मुंबई येथील सेक्टर क्र. २१ व २२ मधील ५,६०० चौ.मी. भूखंड ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या संस्थेस निःशुल्क दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, राठोड यांनी परस्पर भूखंड दुसऱ्या ट्रस्टच्या नावावर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. संत रामराव महाराज यांच्या नावाने मूळ ट्रस्ट पोहरादेवी, जि. वाशीम येथे रजिस्टर असताना मंत्री संजय राठोड यांनी जाणीवपूर्वक संत डॉ. रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्ट ता. दिग्रस, जि. यवतमाळची स्थापना केली.
या ट्रस्टचे संजय राठोड हे स्वतः अध्यक्ष असून त्यांचे सख्खे चुलतभाऊ सचिव आहेत. या ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये दोन व्यक्ती वगळता बाकी सर्व संजय राठोड यांच्या जवळचे नातेवाईक असल्याचा आरोपही केला जात आहे.
नियम व कायदे धाब्यावर बसवून, मंत्रिमंडळाची मान्यता न घेता परस्पर हा व्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. तसेच विमुक्त जाती कल्याण विभागाच्या वतीने प्रशस्त असे समाजभवन बांधून देण्यात यावे व ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघ या संस्थेला हस्तांतरित करावे.
- आकाश जाधव, राष्ट्रीय प्रवक्ते, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.