Railway News
Railway Newssakal

Railway News: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५९०० रेल्वे प्रकल्पांचे एकाच वेळी उद्घाटन

पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपोचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.
Published on


PM Modi:
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (ता. १२) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरात अनेक ठिकाणी एकाच वेळी आयोजित कार्यक्रमांमध्ये ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्‍घाटन करणार आहेत. याशिवाय देशभरातील १० वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.

Railway News
Railway News : रेल्वेने या योजनेतुन केली कोट्यवधींची कमाई; झाली आश्चर्यकारक वाढ

महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या हस्ते एकूण ५०६ प्रकल्पांचे उद्‍घाटन व काही प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले जाणार आहेत. यामध्ये लातूर येथे कोच कारखान्याचे लोकार्पण, बडनेरा येथे वॅगन दुरुस्ती कार्यशाळा आणि पुणे येथील वंदे भारत चेअर कार मेंटेनन्स कम वर्कशॉप डेपोचे उद्‍घाटन करण्यात येणार आहे.

Railway News
Railway News: अहमदाबाद- मुंबई मार्गावर आणखी एक वंदे भारत ट्रेन !

लोकमान्य टिळक टर्मिनस, मनमाड, पिंपरी, सोलापूर आणि नागभीड (चंद्रपूर जिल्हा) येथे पाच जनऔषधी केंद्रांचे उद्‍घाटन नियोजित आहे. याशिवाय नाशिकरोड, अकोला, अंधेरी आणि बोरिवली येथे चार रेल कोच रेस्टॉरंटचे उद्‍घाटनाचा समावेश आहे.


देशभरात या कामांचे उद्‍घाटन
• १५० वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल्स,
• १७० इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम
• १३० सौर पॅनेल
• १८ नवीन रेल्वे मार्ग / रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/ गेज रूपांतरण
• १२ गुड्स शेड
• ७ स्वयंचलित सिग्नलिंग प्रणाली
• ४ गती शक्ती कार्गो टर्मिनल
• ३ विद्युतीकरण प्रकल्प

Railway News
Railway News: फुकट्या प्रवाशांकडून १५७.१२ कोटींची दंड वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.