Bhiwandi News
Bhiwandi Newssakal

Bhiwandi News: भिवंडीतील मोती कारखाने जाणार शहराबाहेर

भिवंडी शहरातील मोती कारखाने शहराबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Published on

Bhivandi News: मोती कारखान्यांमुळे शहरातील लोकवस्तीत प्रदूषण पसरत आहे. मोती तयार करताना योग्य सुरक्षा न घेतल्याने प्रदूषणामुळे कामगारांचे तसेच नागरी वस्तीतील नागरिकांचे जीवन असुरक्षित बनले आहे.

मात्र शहरातील मोती कारखान्याच्या उद्योजकांनी हा व्यवसाय कुटिरोद्योग असल्याचा आभास निर्माण करीत शासनकर्त्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वी आमदार रईस शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली.

त्या वेळी आमदार शेख यांनी केलेल्या शिफारशीनुसार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोती कारखान्यासाठी औद्योगिक क्षेत्रात जागा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भिवंडी शहरातील मोती कारखाने शहराबाहेर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Bhiwandi News
Bhiwandi News: भिवंडीत मनपा उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा; बजेटमध्ये विषेश तरतुद

भिवंडीत प्लास्टिकच्या दाण्यापासून सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरण्यात येणारे मोती तयार करताना प्रदूषण होत आहे. प्लास्टिकचे दाणे अथवा पावडरद्वारे विजेच्या मशीनधून मोती बनवताना उग्र वायू निघत असल्याने प्रदूषण होते. प्लास्टिक मोत्यांना विविध आकर्षक रंग देण्यासाठी विविध घातक रसायनांचा वापर केला जातो. या प्रक्रियेला मेटलायझिंग असे म्हटले जाते. या प्लांटचे प्रदूषण आणि त्यासाठी वापरलेल्या मेटलायझिंग प्लांटची जाळी (फ्रेम) जाळून निघणारा घातक रसायनांचा धूर मानवी जीवन आणि संपूर्ण शहराची स्वच्छ हवा दूषित करीत आहे. सुमारे ४०० कारखान्यांतून ज्या फ्रेम जाळल्या जातात, त्यामुळे शहरात मोठे प्रदूषण होत आहे.

मोत्यांचे उत्पादन आणि मेटलायझिंग शहरातील लोकवस्तीत होत असल्याने स्थानिक समाजसेवक आणि आरटीआय कार्यकर्ते लोकवस्तीत कारखाने बंद करण्याची मागणी करत आहेत. या प्रदूषणामुळे शहरात टीबीचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये अनेक तरुण-तरुणींचा समावेश आहे. यापूर्वी कारखान्यात काम करणाऱ्या अल्पवयीन कामगारांमुळे कारखाना मालकांवर कारवाई झाली होती. त्याचबरोबर बेकायदा मोती उत्पादन आणि मेटलायझिंग प्लांटमध्ये वापरण्यात येणारी रसायनेदेखील धोकादायक आहेत. शहरातील रहिवासी भागातील लोकांना शारीरिक त्रास होत आहे. अशा रसायनांना आगी लागून प्राणहानी झाल्याच्या घटनादेखील नेहमी घडत आहेत. अशा स्थितीत हा उद्योग सुरू ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्धार असेल, तर त्यासाठी केमिकल झोन आणि शहरी लोकसंख्येपासून दूर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी स्थानिक व कारखाना परिसरातील नागरिक करत आहे.

Bhiwandi News
Bhiwandi News: पालिकेची धडक कारवाई; एकाच परिसरातून जप्त केले चारशे किलो प्लास्टिक

कारखानदारांवर कारवाई


पूर्वी सौंदर्यप्रसाधने आणि इतर कामांमध्ये वापरण्यात येणारे प्लास्टिकचे मोती तैवान आणि जपानमधून आयात केले जात होते. आता शहरात मोती कारखाना सुरू झाल्याने या उद्योगास चालना मिळाली आहे. शहरात सुमारे ४०० पेक्षा अधिक मोत्यांचे कारखाने आहेत.

मात्र त्यापासून शहरात होणाऱ्या भयंकर प्रदूषणाविरोधात स्थानिक आरटीआय कार्यकर्ते, समाजसेवी संस्था आणि काही समाजसेवक प्रदूषणाच्या विरोधात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ९३ कारखाने बंद करण्याची नोटीस दिली आहे; तर काही कारखान्यांची वीज खंडित केली आहे. त्यामुळे या मोती उत्पादकांनी सपाचे स्थानिक आमदार रईस लेख यांच्याकडे दाद मागितली होती.

Bhiwandi News
Bhiwandi News: भिवंडीत सोमवारी काही भागात पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.