Adani Dharavi Project
Adani Dharavi ProjectSakal

Mumbai News: सोमवारपासून सुरु होणार धारावी पुनर्विकासचे सर्वेक्षण

झोपडीला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळणार आहे | The hut will get a unique identity number
Published on

Adani Dharavi Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावीतील लाखो झापड्यांचे सर्वेक्षण सोमवार, १८ मार्चपासून सुरू होणार आहे.

हे सर्वेक्षण धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडकडून (डीआरपीपीएल) जाणार असून त्याची सुरुवात मध्य आणि पश्चिम रेल्वेलगत असलेल्या कमला रमणनगर येथून होणार आहे. हा डिजिटल बायोमेट्रिक सर्व्हे असणार आहे. प्रत्येक झोपडीला युनिक आयडेंटिटी क्रमांक मिळणार आहे.

Adani Dharavi Project
Mumbai Politics: मुंबईत भाजप लढवणार पाच जागा; तर ठाणे शिंदेंचेच

धारावीत लहान लहान गल्ल्यांत अनेक झोपड्या दाटीवाटीने वसलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे सर्वेक्षण करणे मोठे आव्हान आहे. कमला रामण नगर येथून लेसर मॅपिंगद्वारे सर्वेक्षणाला प्रारंभ होणार आहे. तात्काळ संबंधित झोपडीधारकांची कागदपत्रे स्कॅन केली जाणार आहेत.

त्यासाठी स्वतंत्र टीम तयार केली आहे. धारावीकरांच्या प्रश्नांना आणि समस्यांना उत्तर देण्यासाठी डीआरपीपीएलने १८००२६८८८८८ हा टोल फ्री क्रमांक जारी केला आहे. सर्वेक्षण करणाऱ्यांना मराठी, हिंदीत बोलण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती ‘डीआरपीपीएल’ने दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Adani Dharavi Project
Mumbai Pollution News: मुंबईचे प्रदूषण झाले कमी, ‘ग्रीन झोन’मध्ये दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.