Crime News: दोन हजारांची लाच भोवली; पोलिस उपनिरीक्षकाला अटक

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप |Allegation that the officer demanded bribe for not taking action in case of violation of rules
Crime News
Crime Newssakal
Published on

Mumbai News: लाचलुचत प्रतिबंधक खात्याच्या मुंबई पथकाने वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाला वाहनचालकाकडून लाच मागितल्याप्रकरणी अटक केली आहे.

फ्रान्सिस रेगो असे आरोपी पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून तो सहार वाहतूक विभागात तैनात आहे. वाहनचालकाने नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई न करण्यासाठी अधिकाऱ्याने लाच मागितल्याचा आरोप आहे.

Crime News
Mumbai Crime: 16 वर्षीय विद्यार्थ्याची परीक्षा केंद्रामध्ये धक्कादायक कृती; महिला पर्यवेक्षकाने पाहिलं, FIR दाखल

तक्रारदाराकडे दोन चारचाकी वाहने असून ती वाहने एका खासगी कंपनीत कामासाठी वापरण्यात येतात. गुरुवारी चालकाने अंधेरी परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल वाहतूक पोलिसांनी वाहन जप्त केले होते. त्यानंतर पोलिसांना वाहनावर १७००० रुपयांचा दंड प्रलंबित असल्याचे आढळले.

यानंतर वाहनचालकाकडे कारवाई न करण्यासाठी आरोपी वाहतूक पोलिस उपनिरीक्षकाने २००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, वाहनचालकाने तक्रारदाराला संपर्क साधून घटनेबद्दल सांगितले. वाहन सोडण्यासाठी २००० रुपयांची लाच मागितली जात असल्याची माहिती तक्रारदाराला मिळाली.

Crime News
Navi Mumbai: वृद्ध महिलेचे १ लाखाचे मंगळसुत्र खेचणारा लुटारु अटकेत

तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क केला. तसेच त्याच दिवशी लेखी तक्रार दाखल केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदाराने केलेल्या आरोपांच्या पडताळणीत उपनिरीक्षक फ्रान्सिसने लाच मागितल्याचे तपास अधिकाऱ्यांना आढळून आले.

त्यानुसार सापळा रचून आरोपी उपनिरीक्षक रेगो याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. रेगो यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime News
Mumbai Cricket: 'तुमच्यासारखा कुलकर्णी येणार नाही...', श्रेयस, शार्दुलसह मुंबईच्या खेळाडूंकडून धवलला मराठीतून शुभेच्छा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.