Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)
Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)sakal

Navi Mumbai News: ..तर पुढील पाच वर्षांत देशात एकही निवडणूक होणार नाही; आमदार जयंत पाटलांचा दावा

मोदी सरकार हे संविधान नष्ट करण्याचे काम करीत आहे, असेही जयंत पाटील यांनी वेळी म्हणाले | Jayant Patil also said at the time that the Modi government is working to destroy the constitution
Published on

Loksabha Election 2024 News: देशात एकाधिकारशाही सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीत भाजप सरकार सत्तेवर आल्यास देशात राज्यघटना नसेल आणि पुढील पाच वर्षांत देशात एकही निवडणूक होणार नाही. त्यामुळे सुशिक्षित मतदारांनी विचार करणे आवश्यक असल्याचे मत आमदार जयंत पाटील यांनी तळोजा येथे व्यक्त केले. (Jayanta Patil mla)

तळोजा फेज दोन सिडको वसाहतीत शेतकरी कामगार पक्षाच्या दीक्षा दिलीप जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्‍घाटन शनिवारी (१६ मार्च) आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. (The Peasants and Workers Party of India (PWP))

 Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)
Navi Mumbai: मनसे माथाडी सेनेचे गणेश म्हात्रेंचा शिंदे गटात प्रवेश

नुकताच ‘एक देश एक निवडणूक’ विषयी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने आपला अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सादर केला. मोदी सरकार सत्तेवर आल्यास देशात पुढील पाच वर्षांनंतर कोणत्याही प्रकारची निवडणूक होणार नाही.

देशात पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. मात्र त्यांनी भारत सरकार म्हणून काम केले. मात्र भाजपने भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार म्हणून नवीन प्रथा सुरू केली आहे. तसेच मोदी सरकार हे संविधान नष्ट करण्याचे काम करीत आहे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

 Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)
Navi Mumbai: वृद्ध महिलेचे १ लाखाचे मंगळसुत्र खेचणारा लुटारु अटकेत

शेतकरी कामगार पक्ष हा अन्यायाच्या विरोधात लढा देणारा पक्ष आहे. नव्याने विकसित होत असलेल्या तळोजा वसाहतीत वास्तव्य करणारे रहिवासी हे शेतकऱ्यांची मुले आहेत. वसाहतीमधील सर्व नागरी समस्या सोडविण्यासाठी शेकाप प्रयत्नशील असेल, असे आश्वासन त्‍यांनी दिले.

यावेळी जयंत पाटील यांच्या हस्ते दीक्षा जाधव यांची शेकाप तळोजा वसाहत दोनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले; तर प्रसाद पाटील, ॲड. अशोक पोटे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला.

 Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)
Navi Mumbai : गणेश नाईकांबद्दल अपशब्द काढल्यास नवी मुंबई पेटून उठेल, भाजप आणि शिंदे गटात वाक्‌युद्ध

यावेळी माजी आमदार बाळाराम पाटील यांनी तळोजा वसाहतीमधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपस्थित रहिवाशांना दिले.

यावेळी व्यासपीठावर माजी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, माजी पंचायत समिती सभापती काशिनाथ पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मढवी, शिवसेना ‘उबाठा’चे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, कामगार नेत्या श्रुती म्हात्रे, शेकापच्या दीक्षा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

 Jayanta Patil mlaThe Peasants and Workers Party of India (PWP)
Navi Mumbai News: नवी मुंबईच्या पोलिसांची मोठी कारवाई; आठ हजार ८२८ वाहनचालकांना दिला दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.