Dharavi Slum Redevelopment
Dharavi Slum RedevelopmentSakal

Mumbai News: धारावीत पहिल्या दिवशी ११८ झोपड्यांना मिळाला युनिक नंबर

धारावीच्या सर्वेक्षणाचे संपूर्ण काम पुढील सहा-आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे | Launch of survey, registration of unique ID number of 118 huts
Published on

Mumbai News: बहुचर्चित असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकास प्रक्रियेला आजपासून माटुंगा रेल्वे स्थानकानजीक असलेल्या कमला रमण नगरातून सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ११८ झोपड्यांना युनिक नंबर देण्यात आले आहेत.

या नंबरिंग प्रक्रियेला रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे धारावीच्या सर्वेक्षणाचे संपूर्ण काम पुढील सहा-आठ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. (On the first day of holding 118 huts got unique number)

धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत संपूर्ण धारावीचा कायापालट केला जाणार आहे. त्यानुसार रहिवाशांच्या घराची माहिती गोळा करण्यासाठी प्रत्येक झोपडीला युनिक आयडी देण्यात येत आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्या उपस्थितीत सर्वेक्षणाला सुरुवात झाली.

आज पहिल्या दिवशी ११८ झोपड्यांना क्रमांक देण्यात आले. टप्प्याटप्प्याने सर्वत्र क्रमांक दिले जाणार असल्याची माहिती श्रीनिवासन यांनी दिली. तसेच ज्या झोपड्यांना नंबरिंग केले आहे, त्या रहिवाशांच्या घरी जाऊन त्यांच्या घराचे पुरावे आणि इतर सर्व माहिती डिजिटल पद्धतीने गोळा केली जाणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मंदिर, मशीद, रुग्णालयांचाही समावेश


धारावीतील प्रत्येक स्ट्रक्चरचा सर्वेक्षणात समावेश केला जाणार आहे. मंदिर, मशीद आणि रुग्णालयाचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच रहिवाशांना सर्वेक्षणाबाबत काही तक्रार असल्यास तात्काळ अधिकाऱ्यांकडे संपर्क करावा, असे आवाहन ‘डीआरपीपीएल’ने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.