Mumbai Metro
Mumbai Metro sakal

Mumbai Metro: मेट्रो स्थानकाखाली वाहन पार्किंग सुविधा

Published on

Mumbai News: मुंबईत वाहनांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पार्किंगची समस्या गंभीर बनत चालली आहे.

त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीएने मेट्रो प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मेट्रो-२ अ आणि ७ या मार्गावरील वेगवेगळ्या स्थानकांच्या खाली वाहनतळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Mumbai Metro
Mumbai News: वर्षभरात जमले नाही, ते आठवड्यात जमेल का? कोर्टाने मनपाला खडसावले

अंधेरी पश्चिम ते दहिसर आणि पुढे गुंदवली मार्गावर २३ स्थानके असून त्याली पुरेशी रिकामी जागा आहे. त्यामुळे या जागा उपयोगात आणण्याचा एमएमआरडीएने निर्णय घेतला आहे. त्यानुसार वेगवेगळ्या स्थानकाच्या खाली पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. त्याचे संचलन करण्यासाठी खासगी एजन्सीची नेमणूक करण्याकरिता निविदा मागवल्या आहेत. सदरच्या पार्किंग लॉटमुळे मेट्रो स्थानकाखाली अनधिकृतपणे होणाऱ्या पार्किंगला आळा बसणार आहे.

Mumbai Metro
Mumbai News: जनहित याचिका दाखल करणे ही फॅशन !; याचिकाकर्त्याला कोर्टाने फटकारले

सध्या मुंबईत ठिकठिकाणच्या रिकाम्या आणि अडगळीच्या जागा गर्दुल्ल्यांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे. त्यामुळे भविष्यात मेट्रो स्थानकाखाली ही समस्या निर्माण होऊ नये, त्याचा गैरवापर होऊ नये, म्हणून या जागांवर पार्किंग करणे फायदेशीर असल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने दिली.

वाहनधारक प्रवाशांना दिलासा


अंधेरी- दहिसर- गुंदवली या मेट्रो मार्गाने ट्रॅफिकमुक्त प्रवास होत असल्याने पश्चिम उपनगरातील अनेक प्रवासी आपल्या घरापासून स्थानकापर्यंत स्वतःच्या वाहनाने प्रवास करतात. मात्र, मेट्रो स्थानक परिसरात वाहने पार्क करण्यासाठी जागा नसल्याने संबंधित प्रवाशांची कोंडी होते. मात्र, आता मेट्रो स्थानकाखालीच वाहनतळ होणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.

Mumbai Metro
Mumbai News: मुंबईचे नवे मनपा आयुक्त डॉ. भूषण गगराणी नक्की आहेत तरी कोण?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.