Mumbai News
Mumbai Newssakal

Mumbai News: जनहित याचिका दाखल करणे ही फॅशन !; याचिकाकर्त्याला कोर्टाने फटकारले

न्यायालयाने गुन्हे नोंदवण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका आज (ता. २०) फेटाळून लावली. | criminal public interest litigation seeking registration of offences.
Published on

Mumbai News: इमारतीच्या बांधकामात नियमांचे उल्लंघन करण्यात आले असून त्यात घोटाळा झाल्याचा आरोप करून याचिका दाखल करणाऱ्यास मुंबई उच्च न्यायालयाने आज फैलावर घेतले.(Bombay High Court)

घोटाळ्याचा आरोप करत थेट न्यायालयात धाव घेणे आणि जनहित याचिका दाखल करणे ही सध्या एकप्रकारे फॅशन झाली आहे, असे फटकारत न्यायालयाने गुन्हे नोंदवण्याची मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका आज (ता. २०) फेटाळून लावली.

Mumbai News
Bombay High Court:'८ भावंड असतानाही मीचं का आई-वडिलांना भत्ता द्यावा ?' पालकांविरुद्ध मुलाची न्यायालयात धाव


मुंबई महापालिकेच्या १५ प्रभागांतील इमारतींत कायद्याचे उल्लंघन करण्यात आले आहे. गुन्हा नोंदवण्याची मागणी करत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठाने नाराजी व्यक्त करत याचिकाकर्त्यांना सुनावले.

Mumbai News
Bombay High Court : वेश्याव्यवसाय गुन्हा नव्हे तर तो सार्वजनिकरित्या करणे गुन्हा - मुंबई उच्च न्यायालय

याचिकाकर्त्याकडे फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(३) अंतर्गत दाद मागण्याचे पुरेसे पर्याय आहेत. असे असताना दाखल केलेल्या जनहित याचिकेत आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही, असे खंडपीठ म्हणाले. मुळात आम्ही येथे पोलिस अधिकारी म्हणून बसलेलो नाही. जनहित याचिकांची थट्टा करू नका. पावित्र्य राखा, अशा शब्दांत न्यायालयाने याचिकाकर्त्याला सुनावले.

Mumbai News
Bombay High Court : 21व्या शतकातही मुलींना वस्तूप्रमाणे...; उच्च न्यायालयांचं महत्त्वपूर्ण निरीक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.