Mumbai Local News
Mumbai Local NewsSakal

Mumbai Local News: फलाट गाठण्यासाठी प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

Published on

नितीन बिनेकर : सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: एकमेव पादचारी पूल, एकच प्रवेशद्वार असलेले स्थानक अशी ओळख हार्बर मार्गावरच्या सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकाची आहे. हार्बर आणि मध्य रेल्वेमार्गासाठी दोन वेगवेगळे स्थानक असले तरी स्वच्छतागृह मात्र एकच आहे. या स्थानकांत सुविधांची वानवा नव्हे तर पूर्ण अभाव असल्याचे चित्र ‘सकाळ’च्या पाहणीतून समोर आले आहे.


पहिल्या मजल्यावर हार्बर रेल्वे आणि तळमजल्यावर मध्य रेल्वे अशी सँडहर्स्ट रोड स्थानकाची बांधणी आहे. या स्थानकात मूलभूत प्रवासी सुविधांचा कायम अभाव राहिला आहे. मध्य रेल्वे मार्गावरून हार्बरवर जाण्यासाठी प्रवाशांना द्रविडी प्राणायाम करावा लागतो.

Mumbai Local News
Mumbai Local News: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे मेगाहाल

जागेअभावी या स्टेशनवर केवळ एकच पादचारी पूल असल्यामुळे प्रवाशांना संपूर्ण फलाट चालत जाऊन बाहेर पडावे लागते. हार्बर स्टेशन उंचावर असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना पायऱ्या चढताना त्रास होतो. त्यामुळे या ठिकाणी सरकते जिने आणि लिफ्ट बसवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे.


रेल्वे स्थानकावरून दोन मार्गांचे प्रवासी प्रवास करतात. स्वच्छतागृह मात्र एकच आहे. त्याची क्षमता कमी असून ते एका कोपऱ्यात आहे. त्यामुळे प्रवाशांना स्वच्छतागृह गाठण्यासाठी वेगळीच पायपीट करावी लागते. तसेच स्थानकात तीन पाणपोई आहेत. मात्र, ग्लास उपलब्ध नाही. ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना नळाला तोंड लावून पाणी प्यावे लागते.

Mumbai Local News
Mumbai Local News: मुंबईकरांनो लक्ष द्या; आता रात्रीच्या वेळी स्टेशनवर येणार बॅटमॅन

रेल्वे स्थानकात रुळाला लागून असलेल्या भिंतीतून आजूबाजूच्या इमारतीतील वापरलेले पाणी सर्रास नाल्यात सोडण्यात येते. ते पाणी नाल्यात गेल्याने दुर्गंधी अधिकच पसरते. आजबाजूला कचऱ्याचे ढिगारे पडले आहे.

नावाचा इतिहास
१९२१ मध्ये हे स्टेशन बांधण्यात आले. १८९५ ते १९०० दरम्यान मुंबईचे गव्हर्नर राहिलेल्या विल्यम मॅन्सफिल्ड यांच्या नावावरून या स्थानकाला सँडहर्स्ट रोड असे नाव देण्यात आले.
प्रस्तावित नाव : हे स्थानक डोंगरी परिसरात असल्यामुळे या स्थानकाला डोंगरी असे नाव देण्याचा प्रस्ताव आहे.


प्रवाशांचे मत
निर्णयाचे समर्थन - ५९ टक्के
प्रवासी सुविधेची गरज - २२ टक्के
नामांतर व प्रवासी सुविधेवर समाधानी - १९ टक्के

Mumbai Local News
Mumbai Local News: मुंबई लोकल स्थानकांची नावे बदला पण इतर समस्या सोडवण्याकडे लक्ष द्या!

काय आहेत समस्या?


आजूबाजूला कचऱ्याचा डोंगर
रुळालगतच्या इमारतील अस्वच्छ पाणी
एकच स्वच्छतागृह
एटीव्हीएम मशीन्सची अपुरी संख्या
सरकते जिने, लिफ्ट नाही


सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकात सरकते जिने, लिफ्टची व्यवस्था आवश्यक आहे. या सुविधा देण्यावर भर द्यावा.
- गणेश शेलार, प्रवासी


स्थानकाचा उच्चार करणे कठीण होते. त्यामुळे नामांतर केले बरे झाले. आता रेल्वेने प्रवासी सुविधांकडे लक्ष द्यावे.
- मोनिका परब, प्रवासी

उन्हाळा आला, त्यामुळे थंडगार पाण्याची रेल्वेने योग्य सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी. येथील पाणपोईची अवस्था बिकट आहे.
- वैभव कुरजेकर, प्रवासी

Mumbai Local News
Mumbai Local News: रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे 'फलाट' करतायेत गर्दीमुक्तीच्या दिशेने वाटचाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()