Mumbai Local News: मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या ब्लॉक; जाणून घ्या संपुर्ण माहिती

Mega Block News| पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे|There will be no block in the suburban section of Western Railway on Sunday
Mumbai Local News
Mumbai Local NewsSakal
Published on


Mumbai Local News: उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी (ता. २४) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात रविवारी दिवसा ब्लॉक नसणार आहे.

Mumbai Local News
Mumbai Local News: रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे 'फलाट' करतायेत गर्दीमुक्तीच्या दिशेने वाटचाल

मध्य रेल्वे

कुठे ः माटुंगा- मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर.
कधी ः सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत.
परिणाम ः सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील; तर ठाणे येथून धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव येथे मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. अप-डाऊन मार्गावरील लोकल सेवा आपल्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचेल.

Mumbai Local News
Mumbai Local News: फलाट गाठण्यासाठी प्रवाशांचा द्राविडी प्राणायाम

हार्बर मार्गावर


कुठे ः कुर्ला-वाशी अप आणि डाऊन मार्गावर.
कधी ः सकाळी ११. १० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत.
परिणाम ः वाशी बेलापूर, पनवेल येथून सुटणाऱ्या सीएसएमटी मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल आणि वाशी दरम्यान विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करू शकतात

पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही


होळी सणानिमित्त पश्चिम रेल्वेने रविवारी ब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Mumbai Local News
Mumbai Local News: लोकलमधील फुकट्यांवर 'बॅटमॅन'चा वॉच; आतापर्यंत तब्बल इतक्या हजार प्रवाशांवर केली कारवाई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.