Thane News: खासगी डॉक्टरांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दिलासा
Thane News: गुरुवार दिनांक 21 मार्च रोजी IMA ठाणे हॉलमध्ये ठाण्यातील डॉक्टर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ठाणे विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी (SRO) श्री शकील शेख, जे सर्व ठाणे संपूर्ण ठाणे शहराच्या रुग्णालयांसाठी MPCB लायसन्स नूतनीकरण करण्याचे अधिकारी आहेत, यांच्यामध्ये अतिशय उपयुक्त आणि संवादात्मक चर्चासत्र झाले.
श्री शेख यांनी जैव वैद्यकीय कचरा नियम 2016 आणि आरोग्य सेवा आस्थापनेसाठी नियमाची लागूता (Bio Medical waste rules 2016 and its applicability to Health care establishment) यावर सादरीकरण केले आणि नियमांच्या मूलभूत बाबीं जसे बायोमेडिकल कचऱ्याचे विलगीकरण, त्याची योग्य साठवणूक आणि MWML ला वेळेवर हस्तांतरित, सांडपाणी मानकांची पूर्तता करणे यासारख्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले .
त्यांनी ,1 मार्च ते 31 मे या कालावधीत लागू असलेल्या ऍम्नेस्टी योजनेबद्दल सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतीच पुढील तीन महिन्यांसाठी (मार्च ते मे 2024) दंडात्मक शुल्क आकारणी मध्ये सूट देण्यासाठी (Penal Fee Amnesty scheme) योजना अधिसूचित केली आहे, जेणेकरून मंडळाच्या वैध संतीपत्राशिवाय operate करणे किंवा संमतीपत्राचे नूतनीकरण करण्यास विलंब करणे यासारख्या उल्लंघनांसाठी रुग्णालयांसह सर्व उद्योगांना प्रोत्साहन मिळावे. श्री शेख यांनी सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.
तसेच त्यांनी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून डॉक्टरांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
एकदा फॉर्म पूर्ण आणि व्यवस्थितपणे भरल्यानंतर आणि नियमांची पूर्तता झ्हाल्यावर सर्व अर्ज मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची अधिकृत व्यक्ती असल्याचा दावा करणाऱ्या आणि काम करून घेणाऱ्या घटकांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी उपस्थित डॉक्टरांना केले.
ऑनलाइन अर्जाशी संबंधित शंकांचे निराकरण करण्यासाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीला 100 हून अधिक सदस्य उपस्थित होते.
या बैठकीमुळे हॉस्पिटलच्या नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी अनिवार्य असलेल्या MPCB लायसन्स जरुरीचे असल्याने व ते मिळण्यास येणाऱ्या अडचणी मुळे अनेक IMA सदस्य चिंतित होते व यामुळे त्यांचा ताणतणाव आणि गोंधळ कमी झाला आहे.
डॉक्टर लोक कायद्याचा पूर्णपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे डॉक्टरांवरचा ताण कमी होऊन सरकारी अधिकारी आणि डॉक्टर यांच्यातील सामांजस्य वाढण्यास मदत होईल
डॉ- संतोष कदम
श्री शकील शेख, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ठाणे यांनी डॉक्टरांना मोलाचा मार्गदर्शन केल्या बद्दल IMA THANE चे अध्यक्ष डॉ. महेश जोशी आणि नियोजित अध्यक्ष IMA महाराष्ट्र राज्य डॉ संतोष कदम यांनी त्यांचे आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.