mumbai Highcourt
mumbai Highcourtsakal

Mumbai News: प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी लैंगिक शोषणाची तक्रार; तरुणाला जामीन मंजूर

Published on

Mumbai News: प्रियकराचे लग्न मोडण्यासाठी महिलेने स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण झाल्याची तक्रार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उच्च न्यायालयाने या घटनेची गंभीर दखल घेत ‘पोक्सो’च्या गुन्ह्यातील तरुणाला जामीन मंजूर केला.

mumbai Highcourt
Navi Mumbai Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना केली अटक

पाच वर्षांच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून २५ वर्षीय ऋषिकेश गिरी याला पुणे पोलिसांनी ३१ जुलै २०२२ रोजी अटक केली होती.

आपल्यावर खोटा आरोप करून ‘पोक्सो’च्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचा दावा करून ऋषिकेश याने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्या. माधव जामदार यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. ऋषिकेश आणि तक्रारदार महिलेचे प्रेमसंबंध होते.

mumbai Highcourt
Mumbai Police: 5 वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन विक्री करण्याचा प्रयत्न; पोलिसांनी १२ तासात घेतला शोध

याचदरम्यान ऋषिकेशचे दुसऱ्या मुलीशी लग्न ठरले आणि त्याचा महिनाभरात साखरपुडा होणार होता. त्याचे निमंत्रण तक्रारदार महिलेला पाठवले होते. त्यावर महिलेने त्याला लग्नानंतरही संबंध ठेवण्यास सांगितले; मात्र ऋषिकेशने त्याबाबत नकार दिला. त्याचा राग काढत महिलेने ऋषिकेशला पोक्सोच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी स्वतःच्या मुलीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली. ही तक्रार करताना तिने ऋषिकेशशी स्वतःचे असलेले प्रेमसंबंध लपवून ठेवले.

यावरून पोक्सो कायद्यांतर्गत आरोपाबाबत संशय निर्माण होत असल्याचा युक्तिवाद ॲड. सत्यम निंबाळकर यांनी केला. न्यायालयाने याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून तरुणाची जामिनावर सुटका केली.

mumbai Highcourt
Mumbai News: दोघांमधील वाद सोडवायला जाणे पडले महागात; हॉटेल आचाऱ्यावर जीवघेणा हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.