thane news
thane newssakal

Thane News: ठाणेकरांना तूर्तास पाणी कपातीपासून दिलासा !

प्राप्त झाल्या नसून कपातीबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती ठाणे पालिका प्रशासनाने दिली
Published on

Thane News: भातसा धरणातून मुंबईसह ठाणे शहराला पाणीपुरवठा करण्यात येत असतो; मात्र या धरणात दोन महिने पुरेल म्हणजे ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची बाब समोर आली आहे.(thane water News)

त्यामुळे पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची वेळ ओढवणार आहे. असे असले, तरी अद्यापही प्राधिकरणाकडून कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नसून कपातीबाबतचा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याची माहिती ठाणे पालिका प्रशासनाने दिली.(water)

thane news
Thane Politics: आनंद परांजपे आणि नजीब मुल्लांना महायुतीत महत्व नाही; शरद पवार गटाच्या नेत्याची टिका

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांतील पाणी साठा ३२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. यामध्ये भातसा धरणाचाही समावेश आहे. या धरण क्षेत्रात ३१.६१ टक्के इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी धरणात ३७.९० टक्के; तर २०२२ मध्ये ४३.६२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा धरणात पाणी साठा कमी आहे. दोन महिने पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक आहे.

thane news
Thane News: भिवंडीत ऐन रमजान महिन्यात पाणीटंचाई

यामुळे धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी पाणीकपात लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले, तरी संबंधित प्राधिकरणाने अद्याप तरी पाणीकपातीबाबत कोणतेही आदेश पालिकांना दिलेले नाहीत. यामुळे पालिकांनी कोणतीही कपात लागू केलेली नाही. पालिकांकडून नेहमीप्रमाणेच पाणी उचलून त्याचा शहरात पुरवठा केला जात आहे.

दरम्यान, यासंदर्भात ठाणे पालिकेचे उपनगर अभियंता विनोद पवार यांना विचारले असता, ठाणे पालिका क्षेत्रात भातसा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरण क्षेत्रातील पाणी साठा कमी झाल्याबाबत किंवा पाणीकपातीबाबत संबंधित प्राधिकरणाने अद्याप कळवलेले नाही. यामुळे शहरात सध्या तरी कोणतीही पाणीकपात लागू केली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

thane news
Thane News : ठाणे महापालिकेच्या चौथ्या मजल्यावरून वसुली कोण करतो? शरद पवार पक्षाने काढले परांजपे-मुल्लांचे वाभाडे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()