Paduka Darshan Sohala 2024: श्रीगुरू दर्शनाचा हा तर दैवी योग
Navi Mumbai News: आजवर संत नरहरी सोनार आणि संत मुक्ताबाई यांचे दर्शन झाले. श्री गजानन महाराजांची शेगावनगरी विदर्भातीलच. त्यामुळे तेथे जाणे होतेच.
परंतु जीवनात कधीही दर्शन न झालेल्या संतांच्या पादुकांचे एकाच ठिकाणी एकत्र दर्शन मिळणे म्हणजे दैवी योगच म्हणावा लागेल. ‘सकाळ’तर्फे आयोजित श्रीगुरू पादुका दर्शन उपक्रमामुळे हे घडून आले, अशी भावना यवतमाळ जिल्ह्यातून तब्बल हजार किलोमीटर अंतर पार करत आलेल्या भाविकांनी व्यक्त केली.
‘श्री फॅमिली गाईड’ उपक्रमाचे कौतुक
आपल्या सर्वांनाच भारतीय पद्धतीने संस्कार मिळाले असल्याने आपुलकी ही आपसूकच येते. आनंद मिळविण्याच्या उद्देशाने लोक पार्टी करतात, पैसे उधळतात; परंतु तो क्षणिक असतो. आनंद मिळविण्यासाठी सेवा, श्रमदान करणे गरजेचे असून त्यात स्वार्थदेखील दूर ठेवायला हवा. हीच संकल्पना ‘श्री फॅमिली गाईड’मध्ये ‘सकाळ’ने अतिशय उत्तमपणे मांडली आहे, असे सागर मुने म्हणाले. संतांच्या पादुकांच्या दर्शनासह सुखी जीवनाचा मंत्र मिळाल्याने मन भरून आले असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संस्कार भारतीचे मुख्य कार्यकारिणी सदस्य सागर मुने (वणी), ज्ञानेश्वर शिंदे (पुसद), दुर्गेश गुरनुले (राळेगाव) आणि संतोष पुरी (उमरखेड) यांच्यासह ४० गुरुसेवक यवतमाळ जिल्ह्यातून वाशी येथील संत पादुका मंदिरात दर्शनाच्या ओढीने दाखल झाले होते. संतांच्या पादुका दर्शनासह आनंदी जीवन जगण्यासाठी ‘श्री फॅमिली गाईड’मार्फत मिळालेल्या ज्ञानाचेही त्यांनी कौतुक केले.
माणसाच्या ज्ञानवृद्धीचा हा एक ट्रेलर आहे. याचे सखोल ज्ञान मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. यामुळे या ज्ञानाचा समाजहिताच्या दृष्टीने प्रचार-प्रसारसुद्धा होईल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीकरिता हे उपयुक्त ज्ञान मिळणे आवश्यक असून त्यांच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, असे मत या गुरुसेवकांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.