Paduka Darshan Sohala 2024: अडीचशे सेवेकऱ्यांनी घेतले गुरु पादुकांचे दर्शन!
Navi Mumbai News: डोंबिवली येथील प्राचीन नागेश्वर नवनाथ ध्यानमंदिरातील सेवेकरी, हरिपाठ करणाऱ्या महिला अशा एकूण अडीचशे गुरुसेवकांनी आज पादुका दर्शनाचा लाभ घेतला. दोन दिवसांपासून अगदी देशभरातून वारकरी, संतभक्तीत तल्लीन झालेल्या भाविकांनी श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवात सहभाग घेतला.
मंदिराचे विश्वस्त व नुकत्याच ठाणे जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय वारकरी अधिवेशनाचे आयोजक तथा अधिवेशनाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संतोष केणे यांच्या माध्यमातून आलेल्या भाविकांनी १८ गुरुमाऊलींच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी हरिपाठ पठणही केले. रिंगण घालत प्रभुनामाचा गजर करत त्यांनी वातावरण भक्तिमय करून टाकले. ‘सोहळ्याबाबत समजताच कालपासून आम्ही या ठिकाणी येत आहोत.
हा अद्भुत सोहळा असून, लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या ‘सकाळ’ माध्यम समूहाने उपलब्ध करून दिलेली ही संधी खरेच अवर्णनीय आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव महाराजांनी खऱ्या अर्थाने आपल्या शिकवणुकीतून महाराष्ट्रच नव्हे; तर देश घडवला. तसे पाहता सध्याचे वातावरणदेखील गंभीरच आहे. मात्र, ‘सकाळ’ने हा उपक्रम हाती घेऊन जणू अंधराकडून प्रत्येकाला उजेडाकडे नेण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.
याची प्रसिद्धी आणि प्रसार होणे गरजेचे आहे. सध्या या उपक्रमाची गरज देशातील राजकीय, धार्मिक आणि सर्वसामान्य नागरिकांना आहे. सध्याची तरुणाई ही व्यसनाधीन झालेली आहे. त्यांना या उपक्रमातून खरा संदेश पोहचवणे गरजेचे आहे. व्यसनापासून परावृत्त राहून संसार प्रपंच सांभाळून परमार्थ करण्याचा मुख्य संदेशच या संतांनी या भूमीला दिला आहे. त्यामुळे हा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहचणे गरजेचे आहे,’ असे संतोष केणी यांनी सांगितले.(Paduka Darshan sohala 2024 sri family guide initiative )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.