Mumba t raja
Mumba t raja sakal

Mumbai News: धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केल्याने आमदार टी राजांवर गुन्हा दाखल

उच्च न्यायालयाने मिरवणुकीला परवानगी देण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी अटी-शर्तींच्या आधारे मिरवणुकीला परवानगी दिली | After the High Court ordered permission for the procession, the police gave permission for the procession on the basis of conditions
Published on

Mumbai News: तेलंगणामधील आमदार राजा ठाकूर सिंह ऊर्फ टी राजा यांच्यावर मिरा रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मिरा रोड येथे धार्मिक तेढ वाढवणारे वक्तव्य केल्याचा ठपका पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला आहे. टी राजा यांनी मिरा रोड येथे केलेल्या भाषणाला तब्बल एक महिना उलटल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.(Mira Road Police has registered a case against MLA Raja Thakur Singh alias T Raja)

Mumba t raja
Mumbai News: मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला मनपाचा ३७५ कोटींचा कर

फेब्रुवारीमध्ये शिवजयंतीच्या मुहूर्तावर टी राजा मिरा रोडमध्ये मिरवणूक काढणार होते. सकल हिंदू समाजाच्यावतीने या मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. टी राजा हे आपल्या प्रक्षोभक वक्तव्याबद्दल ओळखले जात असल्याने, त्याचप्रमाणे मिरा रोडमध्ये काही दिवस आधी जातीय तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी मिरवणुकीला परवानगी नाकारली होती.

याविरोधात सकल हिंदू समाजाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने मिरवणुकीला परवानगी देण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी अटी-शर्तींच्या आधारे मिरवणुकीला परवानगी दिली.

Mumba t raja
Mumbai News: पाळीचा त्रास असह्य झाल्याने मुलीने उचलले टोकाचे पाऊल!

त्यानंतर २५ फेब्रुवारीला ही मिरवणूक काढण्यात आली. त्यात आमदार टी राजा यांच्यासह मिरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यादेखील सहभागी झाल्या होत्या.

मिरवणूक संपल्यानंतर टी राजा यांनी केलेल्या भाषणात एका आक्षेपार्ह विशिष्ट शब्दाचा वापर वारंवार केला. या शब्दाचा वापर करून टी राजा यांनी दोन धर्मांमध्ये शत्रुत्व वाढवणारी, द्वेषभाव निर्माण करणारी, त्याचप्रमाणे एकोपा टिकवण्यास बाधक ठरणारी कृती केल्याचा निष्कर्ष काढून मिरा रोड पोलिसांनी टी राजा, सकल हिंदू समाजाचे नरेश निले यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Mumba t raja
Mumbai News : भिवंडी मतदारसंघाबाबत काँग्रेस आग्रही; पदाधिकारी आक्रमक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.