Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?

पाच वर्षांत विद्यमान खासदारांनी कोणतीही महत्त्वाची विकासाची कामे केली नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे
Published on

KharGhar news: मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वांत शेवटचे टोक असेलल्या खारघर शहरात एक लाखाहून अधिक मतदार संख्या आहे. खारघर शहरात मुख्यतः पाणी आणि मालमत्ता या दोन समस्यांच्या बाबतीत मतदारांमध्ये नाराजी आहे. पाच वर्षांत विद्यमान खासदारांनी कोणतीही महत्त्वाची विकासाची कामे केली नसल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. ()

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?
Navi Mumbai: दागिन्यांसह देशीबनावटीचे पिस्टल हस्तगत; पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, महाविकास आघाडीकडूनही दुहेरी मालमत्ता कराच्या विरोधात आंदोलने झाली. विधानसभेत मालमत्ता कराचा प्रश्‍न उपस्थित केला; मात्र हाती काहीच लागले नाही. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी शिवसेना-भाजप युती आणि महाविकास आघाडीपैकी कोण आघाडी घेणार हे मतपेटीतून दिसणार आहे.

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?
Navi Mumbai News: पिशव्यांचे फुगे चोहीकडे, प्लास्टिक बंदी कुणीकडे

२०१७ मध्ये पार पडलेल्या पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजपने एकहाती विजय मिळवून खारघरमधून बारा नगरसेवक निवडून आणले होते. पालिकेने २०१६ पासून मालमत्ता कर भरण्याचा ठराव आणल्यानंतर भाजपने कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही. विशेष म्हणजे खारघर वसाहत ही पनवेल महापालिकेतील सर्वांत मोठी वसाहत आहे. पालिकेने लादलेल्या दुहेरी मालमत्ता करामुळे आजही मतदारांत चीड आहे.

मतदारांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पाच वर्षांत भरीव विकासकामे केल्याचे दिसून येत नाही. विशेष म्हणजे मतदारांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी मालमत्ता कराविषयी जनतेची बाजू न घेता पालिकेच्या बाजूने मत व्यक्त करताना दिसून आले.

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?
Navi Mumbai Crime: पोलिसांनी रचला सापळा अन् अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना केली अटक

पालिकेने लादलेल्या मालमत्ता कराच्या विरोधात नागरिक संतप्त असताना आणि जनतेची साथ असताना विरोधात असलेल्या महाविकास आघाडीतील शेकाप, शिवसेनाही वाढीव मालमत्ता कराच्या विरोधात तीव्र भूमिका घेताना दिसून आले नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात ४ लाख २३,७१६ मतदार आहेत. तसेच खारघर वसाहतीत १ लाख १४ हजार ६७२ मतदार असून त्यात ६१,८१४ पुरुष; तर ५२,८५७ महिला मतदार आहे

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?
Navi mumbai: वाशी मार्केटमध्ये झाली विदेशी सफरचंदांची एंट्री

वर्चस्व दाखवून देण्यासाठी प्रयत्न


मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे उमेदवार आहेत. पुढील विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर २०२४ मध्ये होणार आहे.

त्यामुळे पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत मताधिक्य मिळवून देत पनवेलमध्ये भाजपचे वर्चस्व आहे हे दाखवून देण्यासाठी बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन प्रचाराला सुरुवात केली आहे.

तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत हे निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू असून गेल्या वर्षभरापासून ते पक्षवाढीसाठी प्रयत्न करत आहेत.

Navi Mumbai: खारघरची एक लाख मत ठरवणार कोण होणार मावळचा खासदार?
Navi Mumbai Crime: ६ लाखांच्या गांजासह दोघांना झाली अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.