Navi Mumbai News: नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत होणार वाढ; प्रवाशांना मिळणार दिलासा
Navi Mumbai: एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यावर सिडको प्रशासनाचा विचारविनिमय सुरू आहे. त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्या खारघर, तळोजावासीयांची वाहतूक समस्या दूर होणार आहे.
तळोजा वसाहतीमधील प्रवाशांना एनएमएमटी बस अथवा दुप्पट भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. आता मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे.
सध्या मेट्रोची वेळ सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे. रात्री १०नंतर मेट्रोची सेवा बंद केली जाते. रात्री दहानंतर खारघर रेल्वे स्थानक ते तळोजा मार्गावर वेळेवर बस उपलब्ध होत नसल्यामुळे सेक्टर ३४, ३५ तसेच तळोजावासीयांना खासगी अथवा रिक्षाने प्रवास करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत.
त्यामुळे सिडको प्रशासनाने रात्री १२पर्यंत मेट्रोची वेळ वाढवावी, अशी मागणी केली जात होती. नागरिकांची वाढती मागणी लक्षात घेऊन सिडकोकडून लवकरच मेट्रोच्या वेळेत वाढ करण्यात येणार आहे. सिडकोच्या मेट्रो विभागातील अधिकाऱ्यांनी याबाबत ‘सकाळ’ला माहिती दिली आहे.
नवी मुंबई मेट्रोच्या वेळेत वाढ व्हावी, अशी प्रवांशांची मागणी आहे. एप्रिल महिन्यात मेट्रोच्या वेळेत वाढ करण्याचा सिडकोचा प्रयत्न आहे.
- प्रिया रातांबे, जनसंपर्क अधिकारी, सिडको
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.