kapil patil and narendra modi
kapil patil and narendra modi sakal

Bhiwandi News: भिवंडीचा गड राखण्याचे भाजपपुढे आव्हान!

मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीदेखील यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला होता| Murbad MLA Kisan Kathore had also expressed his intention to contest this year's Lok Sabha elections
Published on

Thane News: २०१४च्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघ भाजपने आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर २०१९ मध्येदेखील भिवंडी लोकसभेत भाजपने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे; मात्र मागील दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात घडलेल्या सत्तांतरानंतर ठाणे जिल्ह्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

त्यात भाजपने भिवंडी लोकसभेचे विद्यमान खासदार कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल करीत विशेष सन्मान केला आहे. असे असले तरी दुसरीकडे बदललेल्या राजकीय समीकरणामुळे यंदाच्या लोकसभेत महाविकास आघाडीचे महायुतीसमोर आव्हान असणार आहे.

kapil patil and narendra modi
Bhiwandi Lok Sabha 2024: अच्छे दिनाची प्रतीक्षाच! २०२४ ला विकास कामांच्या मुद्द्यांसह बदलत्या राजकीय समीकरणांचा उडणार गोंधळ? लोकसभेची तथ्यचित्रे

त्यात भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे नाव आघाडीवर आहे. तर काँग्रेसनेदेखील या मतदारसंघावर आपला दावा केला आहे.

जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे लोकसभा निवडणुकीत आपले नशीब आजमाविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे विद्यमान खासदारांसमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे भिवंडीचा गड राखण्यात भाजप यशस्वी होणार की, यंदा गडाला खिंडार पडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

kapil patil and narendra modi
Bhiwandi Politics: ठिकाण आणि वेळ तुम्ही ठरवा समोरासमोर बसू; सुरेश म्हात्रेंचे कपिल पाटलांना खुले आव्हान

ठाणे जिल्ह्यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे लोकसभेचे तीन मतदारसंघ मोडतात. त्यात भिवंडी मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपिल पाटील हे केंद्रीय मंत्री असल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यात आगामी लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार म्हणून पुन्हा त्यांच्या नावावर भाजपने शिक्कामोर्तब करीत विश्वास टाकला आहे.

या मतदारसंघात भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, शहापूर, कल्याण पश्चिम आणि मुरबाड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये भिवंडी पश्चिम आणि मुरबाडमध्ये भाजपचे दोन आमदार आहेत. शहापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे. उर्वरित भिवंडी ग्रामीण व कल्याण पश्चिममध्ये शिवसेना शिंदे गटाचे दोन आमदार आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघावर शिवसेना (शिंदे) आणि भाजप महायुतीचे वर्चस्व आहे. असे असले तरी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनीदेखील यंदाची लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त केला होता.

kapil patil and narendra modi
Bhiwandi News: भिवंडीत मनपा उभारणार शिवरायांचा भव्य पुतळा; बजेटमध्ये विषेश तरतुद

त्यानंतर आमदार किसन कथोरे आणि खासदार कपिल पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरू झाले. त्यातच दोघांमधील हा वाद अधिकच वाढत गेल्याचे चित्र दिसून आले होते. त्यामुळे सध्याच्या घडीला भिवंडी लोकसभा मतदारसंघातील चार आमदार महायुतीचे असले तरी, पक्षांतर्गत वादाचा फटका कपिल पाटील यांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाची साथ सोडून सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल झाले आहे. कपिल पाटील यांचे ते कट्टर विरोधक म्हणून मानले जातात. त्यात महाआघाडीत यंदा भिवंडीची जागा काँग्रेस आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होते की, ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात येते.

kapil patil and narendra modi
Bhiwandi News: भिवंडीत सोमवारी काही भागात पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडल्यास सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे हे उमेदवार असू शकतात. त्यामुळे कपिल पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे असा सामना रंगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरेदेखील लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यांनीदेखील या निवडणुकीत उडी घेतल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. या मतांच्या विभाजनाचा फटका कपिल पाटील यांना बसण्याची शक्यतादेखील वर्तविण्यात येत आहे.

विजयाच्या हॅट्‌ट्रीकसाठी घ्यावे लागणार परिश्रम


भिवंडी शहर व परिसर मुस्लिमबहूल आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र आहेत. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर या मतदारसंघांत हिंदू मतदार आहेत. कपिल पाटील, नीलेश सांबरे आणि सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे अशी लढत झाल्यास कुणबी आणि आगरी मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.

kapil patil and narendra modi
Bhiwandi Building Collapse: भिवंडी इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत काढलं बाहेर

तर एमआयएममुळे मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाला मानणाराही मोठा वर्ग भिवंडी लोकसभा मतदारसंघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस, समाजवादी पक्षाची मते जर सुरेश म्हात्रे यांच्या ‘ओंजळीत’ पडली तर कपिल पाटील यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

२०१९ मध्ये पडलेली मते
कपिल पाटील (भाजप) - ५ लाख २३ हजार ५८३
सुरेश टावरे (काँग्रेस) - ३ लाख २८ हजार ८२४
अरुण सावंत (वंचित आघाडी) - ५१ हजार ४५५
एकूण मतदान - १० लाख ५ हजार ६०५

kapil patil and narendra modi
Navi Mumbai News: प्रदूषणामुळे कामोठ्यातील नागरिक हैराण; नागरीकांच्या आरोग्यावर होतोय परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.