Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार

Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार

Published on


Mumbai News: वर्षानुवर्षे पांढरा हत्ती बनून राहिलेल्या ‘मोनो’ची प्रवासी वाहतूक संख्या आणखी वाढणार आहे. एमएमआरडीए दहा मोनो ट्रेन खरेदी करत असून त्यापैकी दोन गाड्या मुंबईत नुकत्याच दाखल झाल्या आहेत.

सध्या धावत असलेल्या गाड्यांच्या तुलनेत नव्याने खरेदी केलेल्या गाड्यांची प्रवासी क्षमता दहा टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे चार डब्याच्या एका मोनो ट्रेनने जास्तीत जास्त ६२४ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.(mumbai mono rail)

Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार
Mono Rail : कोथरूडमधील मोनो रेलचे काम रद्द करा ; ‘आप’ची मागणी


एमएमआरडीएने तोट्यात असलेल्या मोनो रेलला बाहेर काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या चेंबूर- संत गाडगे महाराज चौक या मार्गावर १० गाड्या असून पंधरा मिनिटाला एक याप्रमाणे १४२ फेऱ्या चालवल्या जात आहेत. एक गाडी गेली की प्रवाशांना पुढील गाडी येईपर्यंत सुमारे पंधरा मिनिटे अडकून पडावे लागते.

त्यामुळे दोन गाड्यांमधील वेळ कमी करण्यासाठी एमएमआरडीएने वर्षभरापूर्वी प्रत्येकी चार डब्यांच्या दहा गाड्या खरेदी करण्याचे टेंडर काढले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन गाड्या आल्या आहेत. या गाड्यांची बांधणी मजबूत आणि आटोपशीर असल्याने त्यांची प्रवासी क्षमता दहा टक्क्यांनी वाढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सध्या धावत असलेल्या चार डब्यांच्या एका गाडीने जास्तीत जास्त प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ५६८ एवढी आहे. नव्या गाड्यांची क्षमता ५६ने वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार असून मोनो रेलच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे.

Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार
Mumbai North-East Lok Sabha 2024: ईशान्य मुंबईत महायुती, आघाडी थेट लढत; मनोज कोटक यांच्या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता

चाचणीनंतर सेवेत दाखल होणार


मोनो रेलच्या ताफ्यात दोन नव्या गाड्या दाखल होणार आहेत. सुरुवातीला त्यांच्या वेगवेगळ्या चाचण्या होणार आहेत. त्यामध्ये त्या पास झाल्यानंतर आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच या गाड्या प्रवासी सेवेत आणल्या जाणार आहेत.mu

Mumbai News: तोट्यात असलेल्या ‘मोनो’ला येणार चांगले दिवस? प्रवासी क्षमता वाढणार
MU BCom Exam : मुंबई विद्यापीठाच्या ‘बीकॉम सत्र-६’ची परीक्षा आजपासून; ५४ हजार ८३४ विद्यार्थी देणार परीक्षा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.