Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...

Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...

मेट्रोच्या सेवा वेळेत १ तासाची तर पेंधर येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात आली |The service time of Metro has been increased by 1 hour and the service time of Metro departing from Pendhar has been increased by half an hour
Published on

Navi Mumbai Metro: बेलापूर ते पेंधर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या सेवांमध्ये सोमवारपासून (ता.८) वाढ करण्याचा निर्णय ‘सिडको’ने घेतला आहे.

त्यानुसार, बेलापूर मेट्रो स्थानक येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत १ तासाची तर पेंधर येथून सुटणाऱ्या मेट्रोच्या सेवा वेळेत अर्ध्या तासाची वाढ करण्यात आली आहे.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...
Navi Mumbai Metro rates: मेट्रो सुरू होऊन ५० दिवस झाले नवी मुंबईकरांचा होतोय द्राविडी प्राणायाम, तिकीट दर होणार कमी?

सिडको महामंडळाकडून गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नवी मुंबई मेट्रो रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. या मेट्रोमुळे तळोजा आणि खारघर उपनगरातील वाहतुकीची समस्या काही प्रमाणात दूर झाली आहे.

मात्र मेट्रोची वेळ सकाळी सहा ते रात्री दहापर्यंतच असल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती. खारघर रेल्वे स्थानकाहून तळोजा आणि खारघर सेक्टर २७ ते ३६ परिसरातील प्रवाशांना दुप्पट भाडे देवून खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...
Navi Mumbai Metro: उद्घाटनाविनाच नवी मुंबईच्या मेट्रोला हिरवा कंदील; आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, पाच महिने...?

त्यामुळे मेट्रो सेवेच्या वेळेत वाढ करण्याची मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात होती. ‘सकाळ’ने या संदर्भात बातमी प्रसिद्ध केली होती. याची दखल घेत सिडकोने सोमवारपासून मेट्रो सेवेत वाढ केली आहे. त्यानुसार बेलापूर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री ११.०० वाजता पेंधरच्या दिशेने रवाना होईल तर पेंधर मेट्रो स्थानक येथून शेवटची मेट्रो रात्री १०.३० वाजता बेलापूरच्या दिशेने रवाना होईल.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...
Navi Mumbai Metro : उद्घाटनाविनाच धावणार नवी मुंबईची मेट्रो; मुख्यमंत्र्यांचे आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.