Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा
crime news mumbai Sakal

Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा

मुलावर कारवाई करण्याची घातली भीती, ऑनलाईन केली फसवणूक |Fear of taking action against the child, online fraud juhu police station
Published on

Mumbai Crime: पोलिस निरीक्षक असल्याची ओळख सांगत मुंबईतील ५८ वर्षीय महाविद्यालयीन महिला प्राध्यापिकेची एका तोतयाने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला आहे. तोतया पोलिस अधिकाऱ्याने प्राध्यापिकेच्या मुलाला गुन्हेगारी प्रकरणात ताब्यात घेण्यात आल्याचे सांगत कारवाई न करण्यासाठी एक लाखाची मागणी केली. (juhu police mumbai)

Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा
Mumbai Crime : मुंबईत घरात घुसून मित्रावर गोळीबार; नेमकं कारण काय?

या प्रकरणात पीडित तक्रारदार महिला जुहू परिसरात वास्तव्यास असून त्या जुहूमधील एका विद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. मंगळवारी पीडित कॉलेजमध्ये असताना त्यांना अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन आला. त्यावेळी बोलणाऱ्याने आपण पोलिस निरीक्षक विजय कुमार असल्याचे सांगून एका प्रकरणात तुमच्या मुलाला ताब्यात घेणार असल्याचे सांगितले.

त्यानंतर संबंधित महिलेने आपल्या मुलाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. त्यावेळी तोतया पोलिसाने प्राध्यापिकेकडे कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली.

Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा
Mumbai Crime: पोलिसांची मोठी कारवाई; चार गावठी पिस्तूले व ५९ जिवंत काडतुसे जप्त

घाबरलेल्या महिलेने मुलावर कारवाई होऊ नये, यासाठी तोतयाने सांगितलेल्या बँक खात्यात एक लाख रुपये हस्तांतरित केले. त्याला पैसे मिळाल्यानंतर प्राध्यापिकेला या घटनेबद्दल कुणाला बोलला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकीही दिली.

त्यानंतर काही तासांनी मुलाशी महिलेचा संपर्क झाला, त्यावेळी शहानिशा केल्यानंतर पीडित महिलेला आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर महिलेने जुहू पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी जुहू पोलिस सायबर पोलिसांच्या मदतीने अधिक तपास करीत आहेत.

Crime News: तोतया पोलिस निरीक्षकाने महिला प्राध्यापिकेला घातला लाखोंचा गंडा
Mumbai Crime News : अंधेरीत महिलेवर लैगिंक अत्याचार ; वयोवृद्ध हिरे व्यापाऱ्याला अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.