Gold News: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; अब की बार ७० हजार पार!

Gold News: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; अब की बार ७० हजार पार!

Published on

Gold And Silver Rate: जागतिक पातळीवर मागणी वाढत असल्याने सोने आणि चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. नवी दिल्लीत आज सोन्याचा भाव ७२ हजारांपार गेला. देशांतर्गत बाजारपेठेत आज सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅम ७० हजारांहून अधिक नोंदवला गेला.(latet Gold Rate)

येथील सराफी बाजारपेठेत सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅम (जीएसटीसह शुद्ध सोने) ७० हजार ३०० रुपये झाला, नवी दिल्ली आणि चेन्नईत तो ७२,११८ रुपयांवर पोहोचला. मुंबईत सोन्याचा भाव ७१,६९९ रुपयांवर गेला. चांदीचा भावही आज प्रतिकिलो ८०,५०० रुपयांवर गेला आहे. (Latest Gold News)

Gold News: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; अब की बार ७० हजार पार!
Gold Prices: सोन्याने रचला नवा इतिहास; पहिल्यांदाच पार केला 70 हजारांचा टप्पा

‘आरबीआय’ची साठ्यात वाढ


रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी पतधोरण आढावा बैठकीनंतर भारतीय रिझर्व्ह बँक सोन्याचा साठा वाढवत असल्याचे सांगितले. परकी चलनातील स्थिरतेसाठी सोन्याचा साठा वाढवण्यात येत असून, हा राखीव ठेवीचा एक भाग असल्याचे त्यांनी सांगितले. (latest Gold Silver News)

अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चअखेरपर्यंत देशाच्या परकी चलनसाठ्यातील सोन्याचे मूल्य ५१.४८७ अब्ज डॉलरवर गेले आहे. २२ मार्च २०२३ अखेरच्या तुलनेत त्यात ६.८७ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा जानेवारी २०२४ अखेरीस ८१२.३ टन झाला असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने म्हटले आहे. डिसेंबर २०२३ मध्ये ते ८०३.५८ टन होते.(why gold rates are too high)

Gold News: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; अब की बार ७० हजार पार!
Gold Toilet: सोन्याचं 'टॉयलेट' चोरणारा अखेर ताब्यात; किंमत ऐकून व्हाल चकित

जागतिक पातळीवर भू-राजकीय तणाव वाढत असल्याने; तसेच डॉलर इफेक्ट फॉरेक्स पॉलिसी व अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदरवाढीची द्विधा मनःस्थिती याचा एकत्रित परिणाम सोन्यात सतत होणाऱ्या तेजीत दिसत आहे. त्यामुळेच सराफ बाजारात सोने प्रथमच प्रतिदहा ग्रॅम ७० हजार रुपयांवर गेले आहे. जागतिक पातळीवर डॉलरसारख्या चलनाबाबत अविश्वासाचे वातावरण निर्माण झाल्यावर अन्य चलनांवर कोणाचाही विश्वास राहणे कठीण आहे. त्यामुळेच सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँका परकी चलनसाठे सोन्यात परिवर्तित करीत आहेत. (gold rate in mumbai)


- अमित मोडक, कमोडिटी तज्ज्ञ व सीईओ, पीएनजी अँड सन्सGold

Gold News: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ; अब की बार ७० हजार पार!
Gold Rate Today: गुढीपाडव्याआधी सोन्याने गाठला उच्चांक; भावात आणखी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.