Thane Police: आधी केले वेशांतर, नंतर केला पठलाग; त्या हायफाय चोरट्याला पोलिसांनी 'असे' पकडले
Thane Crime आरोपीला ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.sakal

Thane Police: आधी केले वेशांतर, नंतर केला पठलाग; त्या चोरट्याला पोलिसांनी 'असे' पकडले

ठाणे गुन्हे शाखेने पाच दिवस वेशांतर करून दुचाकीवरून आरोपीची माहिती मिळवली.
Published on

Thane Crime: ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे जिल्हा परिसरात चोऱ्या करून भूमिगत होण्यासाठी विमानाने पळणाऱ्या हायफाय चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. ठाणे गुन्हे शाखेने पाच दिवस वेशांतर करून दुचाकीवरून आरोपीची माहिती मिळवली.

हा चोरटा रमजानसाठी आसाम येथील होजाई जिल्ह्यातील आपल्या मूळगावी आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने आरोपी मोईनुल अब्दुल मलिक इस्लामच्या मुसक्या आवळल्या. त्याने २२ घरफोड्याची कबुली दिली.

तर त्याच्याकडून ८८९ ग्रॅम वजनाचे ६२ लाख २४ हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश पोलिसांना मिळाले. आरोपीला ठाणे न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

Thane Police: आधी केले वेशांतर, नंतर केला पठलाग; त्या हायफाय चोरट्याला पोलिसांनी 'असे' पकडले
Thane Lok Sabha: भाजपच्या ताब्यातील ठाणे १९९६ मध्ये शिवसेनेने हिसकावलं अन्..., नियतीने पुन्हा डाव साधला!

सराईत चोरटा मोईनुल अब्दुल मलीक इस्लाम हा मूळचा आसाममधील होजाई जिल्ह्यातील सामरोली गावातील रहिवासी आहे. त्याने आतापर्यंत नवी मुंबईत ७ गुन्हे, ठाणे जिल्ह्यात १९, मुंबईत १ आणि नवी मुंबईत २ अशा २२ गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी ८८९ ग्रॅम वजनाचे ६२ लाख २४ हजार किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश मिळवले. आरोपी मोईनुल हा मुंबईत भाड्याने घर घेऊन राहत होता.

तो मोबाईल वापरत नव्हता. जरी वापरला तरी तो गुन्हा करताच मोबाईल बंद करायचा, चोरी करण्यापूर्वी तो रेकी करून नंतर चोरी करायचा आणि विमानाने आसाम आणि नागालँडसारख्या आदिवासी राज्यात लपून बसायचा. वातावरण निवळले की पुन्हा मुंबईत भाड्याच्या घरात येऊन अंदाज घ्यायचा अन् पुन्हा विविध भागात चोऱ्या करून पुन्हा विमानाने प्रवास करत भूमिगत व्हायचा. अशी त्याची हाय-फाय कार्यपद्धती होती. याबाबत गुन्हे शाखेच्या पथकाला कुणकुण लागली होती.

Thane Police: आधी केले वेशांतर, नंतर केला पठलाग; त्या हायफाय चोरट्याला पोलिसांनी 'असे' पकडले
Thane News: ठाणे लोकसभेचा तिढा सुटेना; उत्तर मिळत नसल्याने पदाधिकारी संभ्रमात

पोलिस आयुक्तांच्या आदेशाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी घरफोडी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक धनराज केदार, पोलिस हवालदार अमोल देसाई, पोलिस नाईक सचिन जाधव, पोलिस शिपाई भावेश घरत, अमोल इंगळे यांचे विशेष पथक स्थापन केले.

या पथकाने त्याच्या मूळ गावी आसाम येथील होजाई पोलिसांच्या मदतीने चौकशी केली. या वेळी तो रमजान महिना सुरू असल्याने गावी आल्याचे समजताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.

Thane Police: आधी केले वेशांतर, नंतर केला पठलाग; त्या हायफाय चोरट्याला पोलिसांनी 'असे' पकडले
Thane News : सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांच्या गोदामवर कारवाई; राजकीय दबावातून कारवाईची आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.