Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!

Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!

दोन महिन्यांत पुरेशा मनुष्यबळाअभावी या विभागाच्या मोहिमा थंडावण्याची शक्यता आहे|In two months, the missions of this department are likely to cool down due to lack of adequate manpower
Published on


Mumbai News: भेसळमुक्त आणि दर्जेदार अन्न आणि औषधे नागरिकांना मिळावीत यासाठी करडी नजर असलेल्या अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) ८० टक्के अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीच्या कामांना जुंपले आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत पुरेशा मनुष्यबळाअभावी या विभागाच्या मोहिमा थंडावण्याची शक्यता आहे.


‘एफडीए’च्या औषध विभागात १५० ते २०० आणि अन्न विभागात १२५ ते १५० कर्मचारी-अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, निवडणूक कामांमुळे बहुतांश मनुष्यबळ तिकडे वळवल्यामुळे या विभागांत कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे या विभागाच्या मोहिमा थंडावून त्याचा अन्नपदार्थ आणि औषध गुणवत्तेच्या चाचणीवर परिणाम होणार आहे, अशी माहिती एफडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!
Navi Mumbai Metro: नवी मुंबईंकरांसाठी आनंदाची बातमी, मेट्रोच्या सेवेच्या वेळेत वाढ आता...

ही विभागाची प्रमुख जबाबदारी


इतर राज्यांतून येणारी औषधे तपासणे, मेडिकल स्टोअर्समधील विविध कंपन्यांच्या औषधांचे नमुने घेणे आणि राज्यातील औषधांच्या उपलब्धतेवर नियंत्रण ठेवणे ही जबाबदारी औषध निरीक्षकांची आहे. यासोबतच भेसळ रोखण्यासाठी एफडीए अन्नपदार्थांची तपासणी करते. वेगवेगळ्या राज्यांतून गुप्त विक्रीसाठी येणाऱ्या सुगंधित सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांवर कारवाई करण्याची जबाबदारीही विभागाकडे आहे. निरीक्षक हॉटेल आणि रेस्टॉरंटचीही तपासणी करतात.


देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निवडणुका महत्त्वाच्या आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवांतील फार कमी कर्मचारी आणि अधिकारी निवडणुकीच्या कामात तैनात असले पाहिजेत. जेणेकरून कामावर फारसा परिणाम होणार नाही.
- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाऊंडेशन

Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!
Navi Mumbai Crime: खांदेश्वर, पनवेल व परिसरातुन बुलेट व इतर मोटारसायकल चोरी करणारी राजस्थानी टोळी गजाआड

१३ अन्न निरीक्षक निवडणूक कामांत!


अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला असून ८० टक्के कर्मचारी निवडणुकांच्या कामांत गुंतल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अन्न उत्पादक आणि औषध वितरकांच्या परवान्यांचे नूतनीकरण आणि नवीन परवाने देण्याचे काम थंडावले आहे. शिवाय, अन्न सुरक्षा तपासणीच्या मोहिमाही आता रखडल्या आहेत. मुंबईतील १३ अन्न निरीक्षक निवडणुकीच्या कामांसाठी गेले आहेत, अशी माहिती एफडीएचे संयुक्त आयुक्त एस. पी. आढाव यांनी दिली.

Navi Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या मोहिमा थंडावणार; हे आहे महत्वाच कारण!
Navi Mumbai Police: नवी मुंबई पोलिस गडचिरोलीत कर्तव्यावर; तीनशे अंमलदारांसह दहा अधिकारी जाणार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()